- अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्टे:
:
अपंग व्यक्ती रोजगार प्राप्त करू शकत नाहीत. अपंगत्वामुळे त्यांचे जीवन परावलंबी म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून न राहता, त्यांचे जीवन स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रात “अपंग दिव्यांग पेन्शन योजना” सुरू केलेली आहे. या योजनेचा अंतर्गत महाराष्ट्र शासन अपंग व्यक्तींना सामाजिक न्याय व आर्थिदृष्ट्या त्यांचें जीवन स्वावलंबी बनवण्याचा हेतू आहे.अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होणार आहे.राज्य सरकार अशा अपंग व्यक्तींना पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वबळावर आणि सन्मानान जगण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करणे, हे या योजनेचे उद्देश्य आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीने अर्ज केल्यास लाभार्थ्याला राज्य सरकारकडून प्रतिमहा 600/- रुपयांची पेन्शन दिली जाते.
- काय असेल ” अपंग दीव्यांग पेन्शन”(Disability Pension Scheme) योजनेसाठी पात्रता?
अपंग अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षे असावे.
अर्ज करणारा अपंग व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असवा.
अर्जदार अपंग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (income) 35,000/- रुपयांच्या आत असावे.
जर अपंग व्यक्तीला सरकारी नोकरी (Government Job) असेल, तर तो या योजनेसाठी पात्र नसेल.
८० टक्के अपंगत्व असलेला व्यक्तीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- इथे करा ऑनलाईन (online) अर्ज (Application):
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
तिथे गेल्याचानंतर तुम्हाला त्या कार्यालयांमध्ये “अपंग दिव्यांग” पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल.
तो फॉर्म तुम्ही डाऊनलोड देखिल करू शकता, त्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करावे लागेल.
“अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र” (Disability Pension Scheme) Form PDF
वरील फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागतील.
तुमचा फॉर्म वरील कोणत्याही कार्यालयांमध्ये जमा केल्याच्या नंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
अर्जाची पडताळणीनंतर तुमची पेन्शन ( Pention) सुरु केली जाईल.
- या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents)?
:
:
- आधार कार्ड (Aadhar card)
- चालू मोबाईल नंबर ( मोबाईल Number)
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र(Certificate of Disability )
- उत्पन्नाचा दाखला ( Income certificate)
- पासपोर्ट आकाराचे फोटो ( Passport size photo)
- ओळखपत्र ( ID card)
- वय प्रमाणपत्र ( Age certificate)
- बँक खाते पासबुक ( Bank account passbook)
- जाणुन घ्या, अपंग पेन्शन योजनेचे लाभ आणि फायदे कोणकोणती आहेत ते?
:
महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेचा अंतर्गत अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा 600/- रुपयांची पेन्शन देणार आहे.
80 टक्के अपंगत्व असलेली व्यक्तीच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते (Bank account) असणे आवश्यक असणार आहे.