पाहा: तेलाच्या किमतीत होणार पुन्हा वाढ!

भारताला इंडोनेशिया कडून सर्वाधिक पाम तेलाचा पुरवठा केला जातो. मलेशिया हा इंडोनेशया नंतर चा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जो भारत देशाचा पाम तेलाच्या वापरा पैकी40% निर्यात करतो . परंतू इंडोनेशियाचा निर्णय बदलेला असून त्यांनी तेलाचे उत्पादन कमी केले आहे. आणि याचाच परिणाम थेट बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. काहीं दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या होत्या. परंतु ते आता अशक्य होणार आहे. 

जेवणात वापरले जाणारे तेल तसेच उद्योगांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापर होणाऱ्या तेलाच्या किमतीत वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. 

इंडोनेशियाने पाम तेलाचा कमी पुरवठा केल्यास मलेशियाकडून हा पुरवठा भरून काढण्यात येईल. असे खाद्य तेल उद्योजकांनी म्हंटलेले आहे. त्यांचे असे ही म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणात मलेशियाकडून तेल मिळणे अश्यक्यच. 

खाद्य तेल उद्योजकांच म्हणणे आहे की, इंडोनेशियाने एक विधेयक आणले आहे. त्याद्वारे त्यांना इंडोनेशियातील रिफाइंड तेलाच्या किमती खाली आणायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाम तेलाची निर्यातीत घट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

याच कारणामुळे इंडोनेशियातून कमी तेल आयात केल्यामुळे ह्याचा थेट परिणाम भारतीय देशांतर्गत बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. भारत इंडोनेशियामधुन 60% तेल आयात करत असतो.  भारत देश सुमारे 15 दशलक्ष टन खाद्यतेलांच्या गरजे पैकी दोन तृतीयांश आयात करत असतो. 

Leave a Comment

updates a2z