हाडे ठिसूळ होण्यामागचे कारणे….. या गोष्टी अती सेवन करणे हाडांसाठी पडेल महागात….

 

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही (Bone Health) गरजेची आहे. हाडे कॅल्शिअम आणि मिनरल्सपासून (Calcium and minerals) बनलेली आहेत. शरीराची हालचाल हाडांशी निगडित असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या तीन पदार्थांचा समावेश करणे गरजेचा आहे.
 जाणुन घ्या हाडे ठिसूळ होण्यामागचे कारणे:
  1. जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन :
              
 जर तुम्ही गोड पदार्थांचे अधिक सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो. त्याचा परिणाम हा तुमच्या हाडांवर होते. जास्त वजन असलेल्या लोकांना सांधेदुखीच्या समस्या इतरांपेक्षा अधिक असता.
2. आंबट पदार्थ: 

  आंबट पदार्थ जास्त खाल्ल्याने हाडे कमजोर होतात. तसेच टोमॅटो, मशरूम, मिरी, पांढरे बटाटे, वांगी या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असतात, मात्र त्यांच्या अतिसेवनाने हाडांमध्ये जळजळ होते. 
3. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन : 
तुम्ही जितके जास्त मीठ (Salt)खाल तितके तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. मीठ हाडे कमकुवत (Weak bones)करण्याचे काम करते. डॉक्टरांचा मते जे लोक जास्त मीठ खातात त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.
4.  चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन : 
चहा, कॉफी हे शरीरासाठी धोकादायक असते. त्याचा सर्वाधिक फटका हा हाडांना बसतो. कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे हाडांमधून कॅल्शियमची गळती होते. त्यामुळे हाडांडी ताकद कमी होऊन ते ठिसूळ बनतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून कॉफी किंवा चहाचे अधिक सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
5. जास्त प्रमाणात मद्य सेवन  : 
अति प्रमाणात मद्य आणि सोड्याचे सेवन देखील हाडांना हानिकारक आहे. यामुळे तुमची हाडे कमजोर होतात. हाडांची खनिज घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
त्याचबरोबर स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. 

Leave a Comment

updates a2z