- म्युच्युअल फंड म्हणजे काय:
:
- गुंतवणूक करायची तर म्युच्युअल फंडात करा अशा अनेक गोष्टी ऐकत असतो. आपल्यापैकी अनेकजण म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकही करत असतील, मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याची माहिती नसते.
म्युचुल फंड हा असा एक फंड (संग्रह) असतो ज्यात गुंतवणूकदारांचे बरेच पैसे परस्पर एकत्र केले जातात.
म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.
आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड ( Mutual fund). म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचं असतं. बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा यात मिळतो. दरमहा अगदी किमान ठराविक रक्कम भरूनही यात गुंतवणूक करता येते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते.
अशा कंपनीला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) म्हटलं जातं. ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना सादर करत असते. त्यात आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचं व्यवस्थापन ही कंपनी करते. ही कंपनी या सर्व निधीची एकत्रितरीत्या शेअर्स (Shares-Equity), सरकारी रोखे (Government Bonds), डिबेंचर्स (Debentures) आदी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करते आणि त्यावर जो काही नफा- तोटा होतो तो सर्वांना वाटला जातो.
म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांमध्ये या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर (Fund Manager) असतात. ते शेअर मार्केटचा अभ्यास करून चांगल्या वाढणाऱ्या शेअर्समध्ये हा निधी गुंतवतात. सर्वसामान्य गुंतवणुकदाराला थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे धाडस नसते, मात्र शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा लाभ घेण्याची इच्छा असते. अशावेळी म्युच्युअल फंडाचा मार्ग उत्तम ठरतो.
- काय आहे SEBI ( Securities and Exchange Board of India):
म्युच्युअल फंड ( Mutual fund) SEBI नोंदणीकृत आहेत जे भारतातील बाजारावर नियंत्रण ठेवतात. SEBI मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी काम करते. SEBI ची खात्री केली जाते की कोणतीही कंपनी लोकांची फसवणूक तर करीत नाही.
- Mutual fund चे वेगवेगळे प्रकार:
- हेही वाचा: आय टी इंजिनिअर्ससाठी(IT Engineers) आनंदाची बातमी: पुण्यामध्ये लवकरच गूगल(Google) कंपनीचे ऑफिस!!!!!
:
- “मिड कॅप” फंड्स: जे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- “स्मॉल कॅप” फंड्स : हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- “मल्टी कॅप” फंड्स : जे मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- “सेक्टर” फंड्स: हे एकाच प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
- मिड व स्मॉल कँप: (मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)
- बँलन्सड : कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो.
- सेक्टोरल: (एकाच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) आदी विविध प्रकारच्या व कमी जास्त जोखमीच्या योजना असतात. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या व गुंतवणूक कालावधीनुसार योजना निवडावी. (म्युच्युअल फंड व गुंतवणूक या विभागात याची सविस्तर माहिती दिलेली आहे).या प्रकारातील चांगल्या योजना निवडीसाठी,चांगल्या योजना या विभागाला भेट द्या.
- अशी करा mutual funds मध्ये गुंतवणूक:
म्युच्युअल फंडात( investment )गुंतवणूक तीन प्रकारे केले जाऊ शकतात.
- पहिला प्रकार – म्युच्युअल फंड एजंटद्वारे
- दुसरा प्रकार – ब्रोकरमार्फत ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट सुरू करून
- तिसरा प्रकार म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक करणं
मात्र यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
Mutual funds चे फायदे:
- Professional Management
- Diversification (विविधता)
- Variety (विकल्प)
- Convenience (सुविधा)
- Affordable (स्वस्त)
- Tax Benefits
- हे पण वाचा: आनंदाची बातमी : गुंतवणूकदारांसाठी ( SEBI ) सेबीच “साथी” ॲप (app) लवकरच मराठी भाषेत लाँच होणार!!!
:
म्युच्युअल फंडाचे तोटे:
- फी: म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम व्यवस्थापन कंपनी फी स्वरुपात कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो. परंतु फी सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागल्यामुळे मिळणाऱ्या सोईच्या तुलनेत कमी असते.
- गुंतवणुकीवर कमी नियंत्रण: फंडातील रक्कम कोणत्या समभाग/कर्जरोख्यांमध्ये गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे थेट नियंत्रण नसते.
- अनिश्चित परतावा: म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा युनिटच्या बाजारभावावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारभावानुसार त्यात जशी वाढ होऊ शकते तशीच घटही होऊ शकते.
- परताव्याची हमी नाही.
- खर्चाचे प्रमाण
- लॉक-इन कालावधी