गरीबी निर्मूलनासाठी जपानचा निधी (JFPR)
- योजनेचा लाभ:
:
राज्यातील लहान फळे व भाजीपाला (Fruits and Vegetables) उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय ऊपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.
- अटी पाहा:
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकुण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही 14 ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत. या साखळ्यांतील 14 ठिकाणी फळे व भाजीपाला (fruits and vegetables) उत्पादकांच्या एकूण 18 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या असून फक्त 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येतो.
- योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
:
आशियाई विकास बॅंकेच्या (Asian development bank 🏦) मान्यतेने वेळोवेळी निश्चित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचीनुसार कागदपत्रे सादर करावी.
- असा घ्या लाभ:
- काढणी पश्चात हाताळणी, मुल्यवृध्दी, विक्री व्यवस्थापन इ.चे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रशिक्षण.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रक्षेत्र भेटी.
- शेतकरी-खरेदीदार थेट संबंध स्थापित करण्यासाठी विशेष परिसंवाद.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी “फिरता निधी”.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणाऱ्या या प्राथमिक प्रक्रीया सुविधांसाठी अर्थसहाय.
- या निधीचा लाभ घेण्यासाठी येथे संपर्क साधावा:
प्रकल्प संचालक, निधि व्यवस्थापकन कक्ष, JFPR प्रकल्प, दूरध्वनी क्रमांक:(telephone number) 020-2426 0574/5.