- सर्वाधिक ‘ heart attack’ हे बहुतांश वेळा पहाटे सकाळच्या वेळी एवढेच नव्हे तर हा पहाटे सकाळच्या वेळेत आलेला ‘heart attack’ हा सर्वात धोकदायक देखिल असतो.
- हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) जगभरात दररोज किती लोक मरतात याचा अंदाजही लावता येणार नाही. असे म्हटले जाते की बहुतांश वेळा हृदयविकाराचा झटका हा सकाळी 6 वाजता येतो. एवढेच नाही तर या वेळी आलेला झटका हा सर्वात धोकादायक देखील असतो.
- रुदयविकराचा धोका टाळण्यासठी काय करावे ते पाहुयात:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे “वेगाने चालल्याने” रुदयविकराचा धोका 34 टक्क्यांनी कमी होतो. असे ‘Amerika’ ( अमेरिका) येथील ‘ब्राउन यूनिवर्सिटीने‘ नुकत्याच केलेल्या संशोधनात सांगितलेले आहे. फक्त वेगाने चालल्याने महिलांच हार्ट अटॅक खूपच कमी होतो.
दोन दशकांत पर्यंत महिलांवर केल्या गेलेल्या संशोधनानुसार ही गोष्ट समोर आली आहे की वाढत्या वयामध्ये हृदयावर वाढणारी धोके लक्षात घेता आपण नियमितपणे जर चालत असू यामुळे आपल्याला भविष्यात हृदयविकाराचे धोके उद्भवत नाही तसेच नेहमी चालण्याच्या सवयींमुळे आपण हृदयविकाराचा धोका टाळू सुद्धा शकतो.
- हेही वाचा:पाहा: तेलाच्या किमतीत होणार पुन्हा वाढ!
:
महिलांनी रुदयविकरायचा धोका कमी होण्यासाठी कोणती पद्धत वापरावी:
सुरवातीला अमेरिका येथील ” ब्राऊन युनिव्हर्सिटीने” 25000 अधिक महिलांवर दोन दशकापर्यंत संशोधन केले.संशोधनात एक गोष्ट निदर्शनास आली की संशोधनं दरम्यान 1,455 महिलांचे हार्ट फेल (heart fail) झाले. म्हणजेच शरीरातील रक्त आपल्याकडे ओढून घेण्याची जी काही कार्यक्षमता असते ती हृदयाकडून व्यवस्थित रित्या पार पाडली जात नाही.म्हणजे आपले हृदय पूर्ण शरीरात रक्तला पंप करण्या लायक राहत नाही.
अमेरिकन संशोधनंअंतर्गत अभ्यासामध्ये असे समोर आले की,ज्या महिला नियमितपणे वेगाने चालत होत्या त्यांच्या बाबतीत हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी झाला असे दिसून आले.
अमेरिकन संशोधकांच्या मते 1,455 महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यामागचे कारण म्हणजे वाढते वय व त्याचबरोबर वाढत्या वयामुळे त्यांच्या हृदयाची रक्तभिसरण करण्याची जी क्षमता होती ती हळूहळू कमी झाली होती आणि म्हणूनच त्याच्या शरीरातील हृदय जास्त प्रमाणात रक्ताचे पंपिंग करत नव्हते.
नियमित चालण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांच्या या समस्येवर सकारात्मक परिणाम दिसू लागला म्हणूनच वाढत्या वयामध्ये अशा प्रकारचे धोक्यापासून जर आपल्याला आपले हृदय सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल करणे खूपच गरजेचे आहे.
संशोधकांचे हे म्हणणे आहे की धीम्या गतीने चालल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या काही मांसपेशी असतात त्यांची गती हळूहळू कमी होते आणि म्हणूनच हळू चालणाऱ्या लोकांपेक्षा वेगाने चालणाऱ्या लोकांचे आरोग्य नेहमी चांगले राहिलेले आहे तसेच या व्यक्तींना आरोग्य विषयी कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागत नाही,हे स्पष्ट झाले आहे. जास्त प्रमाणात 50 ते 79 या वयोगटतील महिलांना हार्ट अटॅक ची समस्या ही वाढत्या वयामुळे उदाभवत असते.