खुशखबर!! आता नवीन सुंदर आणि डिझायनर “LPG Composite Cylinder” हा आता लवकरच पाहायला भेटेल, जाणुन घ्या, नव्या composite Cylinder चे काय असतील फायदे?.

 

Composite Cylinder:

सध्या देशात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आता नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे.

इंडियन ऑयलनं ग्राहकांसाठी जबरदस्त भेट आणली आहे. इंडियन ऑयलच्या ग्राहकांना आता नव्या प्रकारच्या LPG सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. या नव्या कॉम्पजिट सिलेंडरचे अनेक फायदे ग्राहकांना होतील. इंडियन ऑयलकडून ग्राहकांच्या सुविधेच्या दृष्टीने हा नवीन प्रोडक्ट आणण्यात आला आहे. पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं.

नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी ही  एक आनंदाची बातमी ठरणार आहे. एलपीजी सिलिंडर ( LPG Gas Cylinder)आता स्वस्तात मिळणार आहे. 

  • फायदेशीर मुद्दे:
कॉम्पजिट सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजेन्सीकडे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करायला लागेल.
10 किलो LPG सिलेंडरसाठी 3350 रुपये तर 5 किलो सिलेंडरसाठी 2150 रुपये जमा करावे लागतील.
जुन्या सिलेंडरसाठी जितके खर्च केलेत ती रक्कम कॉम्पजिट सिलेंडरमधून वजा केली जाते.

तसेच हे सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवणे शक्य आहे.

  • कुठे भेटणार हा नवा cylinder आणि कसा होईल याचा फायदा?

 तुम्ही सहजपणे कॉम्पजिट सिलेंडर घेऊ शकता. विशेष म्हणजे तुमचे जुने सिलेंडर कॉम्पजिट सिलेंडरमध्ये बदलू शकता. जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल तर स्टील सिलेंडर घेऊन एजेन्सीमध्ये जा. त्याठिकाणी जुन्या सिलेंडरसाठी जितके खर्च केलेत ती रक्कम कॉम्पजिट सिलेंडरमधून वजा केली जाते. म्हणजे तुम्ही 2 हजार रुपये दिले असतील. तर कॉम्पजिट सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला 3350-2000= 1150 रुपये भरावे लागतील. तर 5 किलो सिलेंडरसाठी 2150-2000= 150रुपये भरावे लागतील.

  • अतिशय सुंदर आणि डिझाईनर असणारं हा नवा सिलेंडर:

हा सिलेंडर ट्रांसपेरेंट असतो ज्यामुळे प्रकाशात तुम्ही सहजपणे पाहू शकता की, आतमध्ये किती गॅस शिल्लक आहे. ही सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना पुढील रिफील कधी करायची आहे याचं प्लॅनिंग करता येते. कॉम्पजिट सिलेंडरवर जंकदेखील लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचं नुकसान होत नाही. स्क्रॅच होत नसल्याने सिलेंडर जास्त सुरक्षित आहे. या सिलेंडरची डिझाईन मॉडर्न किचनप्रमाणे बनवण्यात आली आहे.

कॉम्पजिट सिलेंडर देशातील 28 शहरांमध्ये मिळत आहे. यात अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, बंगळुरु सारख्या अन्य शहरांचा समावेश आहे. तसेच देशातील अन्य शहरात लवकरच हा सिलेंडर पोहचवला जाईल.

Leave a Comment

updates a2z