12 वी सायन्स ( Science) नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करियर( Career) संधी बाबत मार्गदर्शन !!!!

 

शैक्षनिक क्षेत्रात करियर घावडताना जितके  हुशार असणं महत्वाचं असतं तितकंच त्या हुशारी ला करियर संबंधित वेळेवर चांगला मार्गदर्शन मिळणंही गरजेचे असते .  बऱ्याच वेळी विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो काही विध्यार्थी शालेय जेवणात 10वी ते 12 वी पर्यन्त हुशार असतात पण पुढे वेळेवर शैक्षणिक चांगले  मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वा करियर संबंधित निर्णय बरोबर न घेतल्यामुळे करियरमध्ये मागे राहतात. आपण आता १२ सायन्स , कॉमर्स  आणि आर्ट ( science,commerce and art)नंतर असणाऱ्या संधी पाहुया. करिअर हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र असावे, बौद्धिक कॅपॅसिटी प्रमाणे असावे आणि त्यातून चांगला पगारही मिळायला हवा.

12 वी सायन्स नंतर करियर संधी

:

1. इंजिनियरिंग (बी. / बी. टेक):  

इंजिनियरिंग हे कदाचित सर्वात लोकप्रिय आणि निवडलेले करिअर पर्याय आहे.  बहुतेक पालकांना त्यांच्या मुलांनी अभियांत्रिकी करावी असे वाटते. एआयसीटीई माहितीनुसार  दरवर्षी जवळपास १५ लाख अभियंते पदवीधर होतात. जर तुम्ही बारावीनंतर पीसीएमचा पर्याय निवडला असेल तर इंजिनीअरिंग करता येते. या नुसार मग विद्यार्धी JEE वा AIEEE या एक्साम देऊन मिळणाऱ्या गाणानुसार व कॉलेज च्या फीस नुसार इंजिनीयरिंग कॉलेज निवडू शकता. जर इंजिनियरिंग शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केले तर  या क्षत्रात अंदाजे  ३ लाख ते १० लाख रुपये पगाराने सुरुवात होते व  पुढे आपल्या अनुभवानुसार व  बौद्धिक कॅपॅसिटी नुसार  पगारवाढ होत  राहते.

तुम्ही अभियांत्रिकीमध्ये निवडू शकता अशा काही कॉमन शाखा पर्यायांची यादी: 

Computer Science/Information Technology (संगणक शास्त्र)

– Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी)

– Mechanical Engineering(यांत्रिक अभियांत्रिकी)

– Electrical Engineering(विद्युत अभियांत्रिकी)

– Electronics & Communication(इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन)

 – Aeronautical Engineering (वैमानिक अभियांत्रिकी)

 – Automobile Engineering (ऑटोमोबाईल अभियांत्रिकी)

 – Chemical Engineering (केमिकल इंजिनिअरिंग

 – Robotics Engineering(रोबोटिक्स अभियांत्रिकी)

2. मेडिकल   

आपल्या समाजात अशी एक प्रथाच असल्या सारख आहे कि प्रत्येक आई-वडिलांना आपलं पाल्य मुलगा असेल तर ‘इंजिनियर’ आणि मुलगी असेल तर ‘डॉक्टर होयला पाहिजे.  

वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही करिअर निवड करू शकता अशा  पर्यायांची यादी:

MBBS

BDS

BAMS(Ayurveda)

BHMS(Homeopathy)

Bachelor of Pharmacy

Bachelor of Physiotherapy

Nursing

Biotechnology

B.Sc (Botany, Zoology, Nursing, Radiography)

Bachelor of Occupational Therapy

Food and Agriculture Science

Ecologist

3. गणित-विज्ञान विद्यार्थ्यांसाठी 12 वी नंतर इंजिनिअर/ डॉक्टर शिवाय बाकीचे नवीन करिअर पर्याय:

जर तुम्ही 12 गणित-विज्ञान विध्यार्थी असाल आणि इंजिनियरिंग किंवा डॉक्टर साठी असणाऱ्या एक्साम ला कमी गूण मिळाले, वा त्या क्षेत्रात लागणारा खर्च तुम्ही नाही झेपू शकत वा काही कारणाने इंजिनियरिंग किंवा डॉक्टर नाही करता येत आहे असं असेल असा नाहीय कि बाकीचे सर्वे पर्याय संपलेले आहेत. 

नवीन करिअर पर्याय उपलब्ध आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी या वेगवेगळ्या क्षेत्रात कॅरियर घडवलेले आहे. तुमच्या आवडीनुसार  खालील पैकी कोणत्याही एका कोर्से चे लागणारे कोर्स सर्टिफिकेशन्स व डिप्लोमा सर्टिफिकेशन्स करून तुम्ही करिअर करू शकता . 

Artificial Intelligence & Machine Learning

– Data Analytics

– Big Data

– Data Science

– Ethical Hacking

– Robotics

– Aerospace

– Cyber Security

– Physicists & Teaching

– Blockchain Engineer

– Game coderकायदाक्षेत्रात असणाऱ्या संधी


Law ( वकिल):

कायद्याच्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला कायदा (LAW) करावा लागेल, इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही आणि पदवीनंतरही तुम्ही हे करू शकता. इंटर नंतर, आपल्याकडे पाच वर्षांचा लॉ कोर्स असेल आणि पदवीनंतर ती तीन वर्षे असेल. यात प्रत्येक विद्यापीठाद्वारे वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत भाग घेऊन आपण प्रवेश घेऊ शकता. देशातील सर्वात प्रसिद्ध एलएलबी प्रवेश परीक्षा (सीएलबी) सीएलएटी आहे, आपण त्यातही सहभागी होऊ शकता.


प्रशासकीय सेवाक्षेत्रात असणाऱ्या संधी ( MPSC,UPSC):

याव्यतिरिक्त राज्य प्रशासकीय सेवा (MPSC) व केंद्रीय प्रशासकीय सेवा(UPSC) यामध्ये जाण्यासाठी तयारी करता येते. यातून विविध दर्जाच्या प्रशासकीय विभागामध्ये काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 वी पासूनच प्रशासकीय घटकांचा अभ्यास सुरू केल्यास पदवीनंतर अशा परीक्षा देणे सोपे व सोयीस्कर ठरते. या माध्यमातून चांगला प्रशासकीय अधिकारी होता येते.


Leave a Comment

updates a2z