कशी कराल “पीएम किसान” योजने साठी नोंदणी

  •  कशी कराल “पीएम किसान” योजने साठी नोंदणी 

   केंद्र सरकारने सुरू केलेल्या “पीएम किसान” योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे.

तुम्हाला तर माहितच आहे केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून आपल्याला 6000 रूपये दर वर्षी 3 हप्ता प्रमाणे आपल्या खात्यावर जमा करत असते. या योजनेचा दहावा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वर्ग करण्यात आला होता.
असे बरेच शेतकरी आहेत जे या योजने साठी पात्र आहेत पण माहिती नसल्या कारणाने योजने पासून दूर राहतात. जर तुम्हाला या योजने साठी online नोंदणी करायची असेल तर तुम्ही मोबाईल वरुन सुद्धा करू शकता. 
   
   
पात्रता काय आहे  :
  यासाठी सरकारने अगोदर एक अट ठेवली होती, ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टर म्हणजेच पाच एकर  लागवडी योग्य क्षेत्र आहे अशानाच या योजनेचा लाभ मिळत होता, पण ती अट आता सरकारने रद्द केली आहे.
केंद्र सरकार पुढील हप्ता कधी देणार:

 पहिला हप्ता: 1 एप्रिल ते 31 जुलै
 दुसरा हप्ता: एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर
तिसरा हप्ता :एक डिसेंबर ते 31 मार्च

       ऑनलाइन नोंदणी कशी करायची:

हे पण वाचा:
  
  • यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर “पीएम किसान” Sanman Nidhi या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  •        नंतर (farms corner) असे एक option    येईल, त्यावर click करायचे आहे.
  • Click केल्यानंतर (new farmer registration) वर जायचे आहे.
  •  नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
  • त्यानंतर captcha code टाकून राज्य निवडायचे आहे. 
  • नंतर तुम्हाला तुमची पुर्ण माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला बँक खात्याचा तपशील आणि शेतीसंबधित माहिती भरावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे नोंदणी करू शकता. 
      
      
                
      

Leave a Comment

updates a2z