Big Boss: “तेजस्वी प्रकाश”( Tejasvi Prakash) ठरली बिग बॉस ( Big Boss)विजेती….

 सध्या ‘बिग बॉस’ ( Big Boss)हा सर्वाधिक लोकप्रिय शो ( Show)पैकी एक समजला जातो. सध्या बिग बॉस हिंदीचे 15 वे पर्व सुरु आहे. या वर्षीच्या 15 व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या 15 व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. 

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश:

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही या वर्षीच्या बिग बॉस हिंदीच्या 15 व्या पर्वाची विजेती ठरली.
बिग बॉसच्या टॉप 6 मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले. पण टॉप 6 मध्ये दाखल झाल्यानंतर रश्मी देसाई ही कमी मतांमुळे बाहेर झाली. तर निशांत भट्टने १० लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल हे चौघेजण घरात शिल्लक होते. यात तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघेजण टॉप 3 स्पर्धक ठरले.
यातील प्रतीक आणि तेजस्वीने टॉप 2 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने ( Actor Salman Khan) तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले. तर प्रतीक हा या शो चा रनरअप ठरला. काल रात्री उशिरा बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले.
तेजश्री प्रकाशला बक्षिस स्वरुपात काय भेटले?
तेजस्वी प्रकाशला बिग बॉस 15 व्या सिझनची ट्रॉफी( Trophy) देण्यात आली. त्यासोबत तिला 40 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
बिग बॉस मधून तेजस्वी प्रकाश ला झालेला फायदा:

बिग बॉसमध्ये आल्याचे तेजस्वीला तीन फायदे झाले आहेत. यातील 
पहिला फायदा म्हणजे,ती या शो ची विजेती ठरली. 
दुसरा फायदा म्हणजे, एकता कपूरच्या नागिन 6 या आगामी मालिकेत ती नागिनच्या ( Nagin Serial)भूमिकेत दिसणार आहे. तिसरा फायदा म्हणजे,तिचे आणि करण कुंद्राचे ( Karan Kundra) रिलेशनशिप. 
आभार व्यक्त:
बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यासोबत तिने करण कुंद्राचेही आभार मानले.

Leave a Comment

updates a2z