Health tips : महत्वाची माहिती, एक वर्षापर्यंतच्या बाळाला द्या सर्व लसी, बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर…..

 

  • बाळाचे लसीकरण का असते फायद्याचे:
लसीकरण हे ठराविक घातक आजारांसाठी केले जाते. बाळ जन्मल्यावर त्यांचे शरीर खूपच कमजोर असते.आणि कमजोरीमुळे लहान बाळ हे लगेचच आजारी पडतात.अशावेळी आवर्जुन बाळाचे लसीकरण करावे. लसीकरण हे ठराविक घातक आजारांसाठी केले जाते. त्या आजाराची लस घेतल्याने बाळ त्या आजारापासून सुरक्षित राहते.
आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्रात या लसी मोफत मिळतात.
प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस जर लहान मुलांच्या शरीरात गेली तर त्या आजारापासून सुटका होण्यास मदत होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.
त्या आजाराची लस घेतल्याने बाळ त्या आजारापासून सुरक्षित राहते. म्हणून अजिबात न चुकता ठराविक काळाने डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचे लसीकरण करावे. कधी कधी आई वडील बाळाला लसीकरण करायचे विसरून जातात किंवा सारखा सारखा हॉस्पिटलला जायचा कंटाळा करतात. पण असे करणे चूक आहे कारण या गोष्टी बाळाच्या जीवावर बेतू शकतात. म्हणून आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती! या लेखात आपण जाणून घेऊया की बाळ एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्या लसी अजिबात चुकवू नयेत आणि या लसी बाळाला आवर्जुन देणे का गरजेचे आहे.
  • लसीकरण केल्यावर टाळता येतात हे आजार:
लहान मुलांचे असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ प्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.
लसीचे प्रकार:
1. बी.सी.जी.
बाळाचा क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. उपयोगी आहे. ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस-या दिवशीही दिलेली चालेल. शक्यतो ही लस तीन-चार महिन्यांपर्यंत टोचली जावी. काही कारणांनी हे राहून गेल्यास एक वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.
2. कांजण्या प्रतिबंधक लस:
 कांजण्यांची लस दोनदा देणे गरजेचे असते हे लक्षात ठेवावे. पहिला डोस ,12 ते 15 महिन्यांच्या वयात आणि दुसरा डोस, बाळ 4 ते 6 वर्षांचे झाल्यावर द्यावा. बाळासाठी अति महत्त्वाची असणारी ही लस बाळाची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढवते आणि कांजण्यांच्या आजारापासून त्याला दूर ठेवते.
3. हीमोफिलस इंफ्लूएंजा टाइप बी:

ही एक दुसरी महत्वाची लस आहे जी बाळाला दिलीच पाहिजे. हि एक डीटीपी ( DTP)लस आहे. ज्याचे बाळाला 5 डोस द्यावे लागतात.
 पहिला डोस : हा बाळ दोन महिन्यांचे असताना
 दुसरा डोस: हा बाळ चार महिन्यांचे असताना 
तिसरा डोस :हा बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर
चौथा डोस :हा 15 ते 18 महिन्यांच्या दरम्यान आणि पाचवा डोस : बाळ 4 ते 6 वर्षांचे झाले की दिला जातो.
4. हेपेटाइटिस बी:
हेपेटाइटिस बी ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची लस असून याचा पहिला डोस अजिबात चुकवू नये. बाळाला या लसीचे 3 ते 4 डोस दिले पाहिजेत. पण ही लस कोणत्या ब्रांडची आहे ते मात्र तपासून घ्यावे. चांगली गुणवत्ता असेल तर जास्त डोस घेण्याची गरज नाही. पण अशावेळी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
पहिला डोस बाळ जन्माला आल्यावरच दिला जातो. 
दुसरा डोस हा बाळ 1 किंवा 2 महिन्याचे झाल्यावर दिला जातो.
 तिसरा डोस गरज भासली तर चौथ्या महिन्यात देतात आणि शेवटचा डोस 6 ते 18 महिन्यांदरम्यान बाळाला दिला जातो.

5. त्रिगुणी लस:
या लसीत डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसींचा समावेश आहे. त्रिगुणी लस वयाच्या तिस-या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचतात. लस टोचल्यानंतर एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅमालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध द्यावे. संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहे. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.
6. इंफ्लूएंजा:
इंफ्लूएंजा लस ही 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांना देतच राहणे गरजेचे आहे. ९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या काही बाळांना या लसीचे दोन डोस गरजेनुसार घ्यावे लागतात. अर्थातच डॉक्टर तपासणी नंतरच लस घ्यावी कि घेऊ नये त्याचा सल्ला देतात. त्यामुळे पहिला डोस वेळेनुसार द्यावाच, तो गरजेचे आहेच. पण पुढचा डोस हा डॉक्टर जे सांगतील त्या नुसार गरज असेल तर द्यावा. अन्यथा देऊ नये.
7. गोवर प्रतिबंधक लस:
गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ  किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार होऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर लस महत्त्वाची असते.
बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठीही शीतकपाट आवश्यक असते.
8. पोलिओ :
पोलिओ आजार बाळाला शारिरीकदृष्ट्या अपंग बनवू शकतो. त्यामुळे अजिबात न चुकता ठरलेले सगळे डोस दर महिन्याला बाळाला द्यावे. सामान्यत: बाळाला पोलिओचे चार डोस दिले जातात. 
पहिला डोस हा बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर दिला जातो. 
दुसरा डोस बाळ चार महिन्यांचे झाल्यावर देतात.
 तिसरा डोस हा ६ ते १८ महिन्यांच्या दरम्यान बाळाला दिला जातो .
चौथा व शेवटचा डोस बाळ ४ ते ६ वर्षांचे झाल्यावर देतात.
बालरोगतज्ञ परिषद तोंडी पोलिओच्याबरोबर पोलिओ लसीचे इंजेक्शनपण द्यायची शिफारस करते. यामुळे पोलिओपासून 100% संरक्षण मिळते.
पी.सी.व्ही. 7 ही लस सहाव्या आठवड्यानंतर घ्यावी. याने न्यूमोनिया, मेनेंजायटीस आणि कानात पू होण्यापासून संरक्षण मिळते.
कांजिण्या लस. ही लस 15व्या महिन्यानंतर घ्यावी.
अ कावीळ, 18व्या महिन्यानंतर घ्यावी.
बालअतिसाराविरुद्ध रोटाव्हायरस लस सहा आठवड्यानंतर घेता येते.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध 14-18 वयोगटात मुलींनी एच.पी.व्ही. लस घ्यायला हरकत नाही.

Leave a Comment

updates a2z