जाणून घ्या: बॉक्स ऑफिसवर ” गंगुबाई काठियावाडी” चित्रपटाची कमाई….

 

“गंगूबाई काठियावाडी” हा आगामी हिंदी चित्रपट ( Hindi Movie) संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ( Director Sanjay Lila Bhansali) असून जयंतीलाल गाडा ( Jayantilal Gada) आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट ( Aliya Bhatt), विजय राज( Vijay Raj), इंदिरा तिवारी ( Indira Tivari) आणि सीमा पाहवा ( Seema pahva) यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण ( Ajay Devgan) आणि इमरान हाश्मी ( Imran Hashmi)या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.हा चित्रपट मुंबईतील (mumbai) कामाठीपुरा (Kamathipura) येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित आहे.हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर गंगुबाई काठियावाडी चित्रपटाची कमाई:
पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता, आलियाचा हा चित्रपट विकेंडला धमाल करेल असे म्हटले जाते.
चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, आलियाच्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन हे सुमारे 9 ते 10 कोटी इतके आहे. चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एवढी कमाई केली.
करोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. हे पाहता हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड तोडू शकतो. 
दुस-या दिवशी चित्रपटाने 14 कोटींचा गल्ला केला. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट येत्या काही दिवसात नक्कीच धमाल करेल असा विश्वास आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श ( Taran Adarsh) यांच्या ट्विटनुसार ( Twitt), आलिया भट्टचा ( Aliya Bhatt) चित्रपट पॅंडेमिक टाइममध्ये तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

Leave a Comment

updates a2z