आरोग्य: जाणुन घ्या, लठ्ठपणा होण्यामागचे कारणे, तसेच अती लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजाराबद्दल?

 

लठ्ठपणा हे अनेक आजारांचे बोलावणे असते. जिथे चढणे-उतरणे, वेगाने चालणे, चपळतेने काम करणे अशा गोष्टी सहज न जमण्यापासून हृदयविकार, वाढता रक्तदाब व मधुमेह असे नाना प्रकारचे आजार परस्परांच्या हातात हात घालून शरीरात प्रवेश करतात.
काहीं जणांना असाही प्रश्न पडतो की,माझे एकूण जेवण खूप कमी आहे; तरीसुद्धा माझे वजन का वाढते? काहीं जन तर असेही म्हणतात, घरात सगळ्यांत कमी जेवण मी करतो किंवा करते, तरी माझेच वजन जास्त आहे, असे का? वजन वाढीची विविध कारणे असतात.
जाणुन घेऊ या लठ्ठपणा होण्यामागचे कारणे:

1. ताणतणाव :
 आजकाल अनेकांना ताणतणावाची समस्या असते. काही जणांचे वजन ताणतणावाने कमी होते, तर काहींचे वाढते. ताणतणावाने शरीरावर परिणाम होतोच.
2. जीवनशैली : 
आजच्या जीवनशैलीमध्ये कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची कष्टाची कामे होती परंतू आताच्या जीवनशैलीमध्ये अशी कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत. त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन नियंत्रणात आणता येईल.
3. अनुवंशिकता : 
लठ्ठपणाचा अनुवंशिकतेशी मोठा संबंध आहे. लठ्ठ आई-वडिलांची मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता बरीच जास्त असते. ज्या घरी पालकांचे वजन जास्त असेल, त्यांनी याविषयी सजग राहून, आपल्या मुलांना चांगली जीवनशैली द्यावी. अनुवंशिकता बदलता येत नाही; पण जीवनशैलीत आरोग्यदायी बदल नक्कीच करता येतात; जेणेकरून मुलांची वजन वाढ टाळता येईल.
4. औषधांचे साइड इफेक्ट : 
काही आजारांमध्ये दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे वजन वाढू शकते. डायबेटीससाठीची काही औषधे वजन वाढण्याचे कारण ठरू शकतात. स्टेरॉइड प्रकाराची औषधेदेखील वजन वाढवू शकतात.
5. हार्मोनल असंतुलन:

लेप्टिन : या हार्मोनमुळे आपल्याला पोट भरल्याचे समाधान होते. हे हार्मोन आपल्या मेंदूला पोट भरल्याचे सांगते व आता अजून जेवण्याची गरज नाही, हा सिग्नल आपल्याला मिळतो. या हार्मोनचे कार्य बिघडल्यावर (लेप्टिन रेजिस्टन्स) ही सिग्नल यंत्रणा नीट काम करीत नाही. जास्त भूक लागून वजनवाढ होते.
थायरॉइड : थायरॉइड हार्मोन्सच्या कार्यांपैकी, वजनाचे नियंत्रण राखणे हे महत्त्वाचे कार्य आहे. आपण काम किंवा व्यायाम करताना शरीरातील ऊर्जा (कॅलरीज) खर्च होण्याचा वेग, थायरॉइड हार्मोनच्या विकारात मंदावतो. त्यामुळे वजन वाढते.
मासिक पाळी जात असताना (मेनोपॉज) : शरीरात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळेदेखील त्या काळात वजन वाढू शकते.
हाय कॉलेस्ट्रॉल मुळे देखील वजन वाढते.
6. अनियमित आहार पद्धती:
 जीवनशैलीत कामाव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आहे, खाण्यापिण्याच्या सवयींचा. भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पाळले पाहिजे. आपण काय खातो, यावर लक्ष असायला हवे. पोषकतत्व न देता भरपूर कॅलरीज देणारे पदार्थ खाल्ले, तर वजन वाढेलच. हल्ली बाजारातील पदार्थ खाण्याचे, शीतपेये पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आइस्क्रीम, चॉकलेट तसेच फारशा पौष्टिक नसलेल्या, भरपूर बटर किंवा साखर असलेल्या खाद्य पदार्थांच्या सतत आसपास असतो. हे सर्व बदलले पाहिजे. 
7. डिलिव्हरी नंतर वजन वाढणे:
गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. त्याच वेळी, प्रसूतीनंतर, स्त्री बाळाच्या काळजीत इतकी अडकली की, ती स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाही. एवढेच काय तर नीट झोप देखील मिळत नसते आणि तुमचे शरीर गरोदरपणा आणि डिलिव्हरी मधून हळूहळू हिल होत असते. … अशावेळी वजन कमी करणे मुश्कील होऊन जाते.
अतीवजनमुळे होणारे आजार:
1.हाय ब्लड प्रेशर
2.डायबिटीज
3.मणक्यामध्ये गॅप येणे, गुडघ्यात गॅप येणे
4.हाडांचे विविध आजार होणे
5.हार्ट अटॅक
6.पॅरालीसीस वेरिगोव्हेन्स
7.इन फर्टीलिटी (वंध्यत्व),
8.पिसीओडी , पीसीओएस
9.त्वचेत फंगल इन्फेक्शन,

Leave a Comment

updates a2z