सखी आणि तिचे सौंदर्य: तुमच्या या वाईट सवईमुळे होऊ शकतात, ‘ओठ’ काळे…आणि या घरगुती उपायाने होतील मुलायम ओठ…..

 

ओठ काळे पडण्यामागाचे बरेच कारणे असू शकतात.ही कारणे काही नैसर्गिक असु शकतात तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली असतात. सहसा हा बदल ओठांची काळजी न घेतल्यामुळे देखील होतो. तसेच काही वैद्यकीय कारणांमुळे देखिल ओठ काळे पडू शकतात.

पाहुयात ओठ काळे पडण्यामागचे कारणे:

1. कमी पाणी पिणे:

 जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते,तेव्हा त्याचा परिणाम ओठांवरही दिसू लागतो. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी झाल्याने ओठांची त्वचा हायड्रेशनच्या अभावामुळे काळी आणि कोरडी होऊ लागते. त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्या.

हेहि वाचा: हाडे ठिसूळ होण्यामागचे कारणे….. या गोष्टी अती सेवन करणे हाडांसाठी पडेल महागात….

2. जास्त प्रमाणात गरम चहा- कॉफी पिने:

 चहा किंवा कॉफी पिणे ही सवय ओठांच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे. यामुळे ओठांना वारंवार चटका बसतो. गरम चहाचा चटक्यामुळे  ओठ काळे पडू लागतात.

3.  हलक्या प्रमाणाचे कॉस्मेटिक्स घटकांचा वापर:

एलर्जिक घटक म्हणजे, लिपस्टिक, लिपलायनर, लिपग्लॉस हे कॉस्मेटिक्स जर हलक्या दर्जाचे वापरले तरी देखील ओठांचे खूप नुकसान होते. कारण या हलक्या कॉस्मेटिक्समध्ये खूप जास्त केमिकल्स असतात आणि ते ओठांना सहन होत नाहीत. त्यामूळे कॉस्मेटिक हे कमी प्रमाणात तसेच चांगल्या क्वालिटी चे वापरावे.

4. धूम्रपान करणे ( Smoking):

तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर त्याने देखिल ओठ काळे पडतात.कारण तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन आणि बेंझोपायरिन आढळतात, जे तुमच्या शरीराला मेलेनिन तयार करण्यासाठी उत्तेजित करू शकतात आणि यामुळे तुमचे ओठ काळे होऊ शकतात.ओठांना काळं बनविणारी ही एक वाईट सवय आहे.

हेहि वाचा: आरोग्य: आपल्या जीवनात औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ” तुळशीचे” महत्व तसेच गुणधर्म जाणुन घेऊया:

5. ओठ चावणे:

काही जणांना वारंवार दाताखाली ओठ चावण्याची किंवा ओठांवरून वारंवार जीभ फिरविण्याची सवय असते. ही सवय ओठांचं नुकसान करते. या सवयीमुळे ओठ एकतर काळे पडतात.

मुलायम ओठ करण्यासाठी या टिप्स वापरा:

1. हळद आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये दोन चमचे कोरफडचा गर मिक्स करा. हळद आणि कोरफडच्या पेस्टमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. ही पेस्ट ओठांवर लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होईल.

2. हळद आणि तूप एकत्र करा. हा पॅक ओठांवर लावा. 10 मिनिटांनी हलक्या हाताने चोळून ओठ धुवून टाका. 

3. बीट किसून त्याचा रस काढा आणि त्यात बटर घाला. रात्री झोपण्यापूर्वी या क्रीमने ओठांवर मसाज करा. यामुळे ओठांवरील काळेपणा दूर जाण्यास मदत होईल.

4. लिंबू:

लिंबू देखिल मुलायम ओठ करण्यासाठी मदत करते.यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाची फोड आपल्या ओठावर ठेऊन हळुवार चोळवी. हा घरगुती उपायाने हळूहळू तुमचे ओठ मुलायम होण्यास मदत होईल.

 

Leave a Comment

updates a2z