दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना सातवी आठवीतील क्रीडा स्पर्धेच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना नववी दहावी क्रीडा स्पर्धेच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षण मंत्र्यानी या बाबतचे निर्णय शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिले आहे. ही सवलत केवळ 2021 2022 च्या परीक्षेकरिता लागू होणार आहे.
हेही वाचा: जाणून घ्या: कश्या होतात intermediate and Elementary (एलिमेंटरी / इंटरमिजिएट ) परीक्षा …….
:
परीक्षेचं वेळापत्रक:
प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे.
विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे जादा वेळ तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.