जाणून घ्या: कश्या होतात intermediate and Elementary (एलिमेंटरी / इंटरमिजिएट ) परीक्षा …….


एलिमेंटरी / इंटरमिजिएट (intermediate and Elementary) बद्दल काही मार्गदर्शन: 

दरवर्षी हजारो विद्यार्थी एलिमेंटरी – इन्टरमिजिएट या परीक्षांना बसतात. दोन दिवस चालणाऱ्या एलिमेंटरीच्या परीक्षेचे दररोज तीन पेपर असतात, तर इन्टरमिजिएट परीक्षेचे तीन दिवस दररोज दोन पेपर असतात. या परीक्षेला जाताना आवश्यक साहित्यसामग्री सोबत असणे साधने आवश्यक आहे. 
या परीक्षेत आधी कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात असे. मात्र, नव्या अभ्यासक्रमात मुलांच्या कल्पना आणि विचारांच्या प्रकटीकरणाला भरपूर वाव आहे आणि गुण देतानाही या गोष्टी विचारात घेतल्या जातात.  
या परीक्षेत केवळ ड्रॉइंगच नव्हे तर रंगकामही करायचे असते. स्थिरचित्र, संकल्पचित्र, स्मृतिचित्रांसोबत काही प्रमाणात अक्षरलेखन आणि निसर्गचित्र करावे लागते. यात कलानिर्मितीला वाव असतो. मुक्त हस्तचित्रात तोल, प्रमाण, लय यांची समज होते. भौमितिक व यांत्रिक साधनांच्या उपयोगाने हस्तकौशल्य व दृष्टी विकसित होते.


 कश्या प्रकारे असतात एलिमेंटरी / इंटरमिजिएट (intermediate and Elementary) परीक्षेचं स्वरूप: 

या परीक्षेत एलिमेंटरी Elementary परीक्षा उत्तीर्ण होऊनच इंटरमिजिएटला intermediate  बसायला हवे. 

विद्यार्थ्यांने सर्व म्हणजेच सहाच्या सहा विषयांच्या परीक्षा देणे गरजेचे आहे. एका विषयात जरी विद्यार्थी गरहजर (एबी) असेल आणि बाकी पाच विषयांत अ श्रेणी संपादन केली असेल तरी तो विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण ठरतो. या परीक्षेत विद्याथ्याला कमीत कमी चार विषयांत उत्तीर्ण व्हावेच लागते.

यात ऐकून सहा परीक्षा असतात.

प्रश्नपत्रिका 1: स्थिरचित्र 

प्रश्नपत्रिका 2: निसर्गचित्र 

प्रश्नपत्रिका 3: स्मरणचित्र 

प्रश्नपत्रिका 4: संकल्पचित्र 

प्रश्नपत्रिका 5: मुक्तहस्त चित्र 

प्रश्नपत्रिका 6: भूमिती 

या वर्षी इंटरमिजिएटला, एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षा आता ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

दि. 18 जानेवारी 2022 च्या पत्रानुसार सदर परीक्षा दि. 12 व 13 फेब्रुवारी 2022 या दिवशी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा दि. 22 व दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी होण्याचे कळविण्यात आले होते. परंतु संपूर्ण परीक्षा नेमकी कोणत्या स्वरुपाची होईल याची अद्याप कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नव्हती, त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

आज अखेर या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

updates a2z