कल्याणकारी योजना : या योजेअंतर्गत आता बांधकाम कामगार पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात…….

 

 
 महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवत आहे, यामध्ये आरोग्यविषयक व अर्थसहाय्य, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा यांचा समावेश आहे. यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
 
काय आहे कल्याणकारी योजना:
 या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना या योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कामगार आपल्या पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
असा घ्या लाभ:
1. पहिली ते सातवी ( 1 ली ते 7 वी) मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी:
या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी सरकार प्रतिवर्षी 2500 रुपये देणार.
2.  आठवी ते दहावी ( 8 वी ते 10 वी) मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी प्रतिवर्षी 5000 रुपय देणार.
तसेच या साठी 75% पेक्षा अधिक गुण असणें आवश्यक असेल.
पात्रता:
यासाठी 75% हजेरी बाबत शाळेचा दाखला आवश्यक
3. दहावी ते बारावी (10 वी ते 12 वी) या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी सरकार प्रतिवर्षी 10000 रूपये देणार. तसेच यासाठी 50% किंवा अधिक गुण असणें आवश्यक आहे.
50%गुण किंवा अधिक गुण घेतल्याची गुणपत्रिका आवश्यकच असणार.
:
4. अकरावी ते बारावी (11 वी ते 12 वी ) च्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी 10000 रूपये भेटणार. यासाठी 11 वी ते 12 वी ची गुणपत्रिका आवश्यक.
5. पदवीच्या अभ्यासक्रमकरीता प्रतिवर्षी 20000 रुपये भेटणार. त्यासाठी नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीची सही आवश्यक. त्याच बरोबर मागील शैक्षणीक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आवश्यक.
चालू शिक्षणीक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती आणि bonafile आवश्यक.
6. वैद्यकीय पदविकरिता 10,0000 रुपय देणार तर अभियांत्रिकीसाठी 60,000 रुपये भेटणार.त्यासाठी नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीची सही आवश्यक. त्याच बरोबर मागील शैक्षणीक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आवश्यक.
चालू शिक्षणीक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती आणि bonafile आवश्यक.
 
7. MS-CIT केलेले असल्यास शुक्लची प्रतिपूर्ती केली जाईल. त्यासाठी MS-CIT झाल्याचे प्रमाणपत्र तसेच शुकलाची पावती आवश्यक.
8. तसेच शासनमान्य अभ्यासक्रम असलेल्या पदविकेमध्ये प्रतिवर्षी 20,000 रुपय मिळणार.तर पद्युत्तर पदविकेमध्ये
प्रतिवर्षी 25,000 रुपये भेटतात.त्याच बरोबर मागील शैक्षणीक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आवश्यक.
चालू शिक्षणीक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती आणि bonafile आवश्यक.

Leave a Comment

updates a2z