जाणून घ्या: सरकारचा मुलीच्या लग्नाचे वय 21 वर्ष करण्यामागचा काय उद्देशआहे?

 

केद्रीय मंत्रिमंडळाने मुलीचा लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे केलेले आहे.

यापूर्वी देशात मुलींचे लग्नाचे किमान वय 18 वर्षे आणि मुलांचे लग्नाचे किमान वय 21 वर्षे आहे. अणि आता जर मुलींच्या लग्नाचे वय 21 केले तर मुलांचे किती करणार? की आता दोघांचीही वयाची अट समान करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांचा  मुलीचे लग्नाचे वय 21 वर्ष करण्यामागचा प्रस्ताव:
  • :

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यामागची कारण स्पष्ट करताना सांगितले होते की, महिलांना निरोगी बनवणे आणि त्यांना कुपोषणापासून वाचवणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याचबरोबर लग्नाचे वय वाढवून कमी वयात महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखायचे आहेत.मुलींना कुपोषणापासून वाचवण्यासाठी त्यांचे योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे.सध्या भारतात विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वर्षे आणि पुरुषांसाठी 21 वर्षे आहे. कायद्यातील बदलानंतर आता स्त्री आणि पुरुष दोघांसाठी लग्नाचे किमान वय 21 वर्षे होणार आहे.

टास्क फोर्सबाबत माहिती देताना “अर्थमंत्री निर्मला सीतारामन” यांनी 2020-21 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, 1978 मध्ये शारदा कायदा 1929 मध्ये बदल करून मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षांवरून वाढवून 18 वर्षे करण्यात आले होते. मुलींसाठी लग्नाचे वय वाढविण्याच्या प्रस्तावात कारण स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, भारत आता प्रगती करत असताना महिलांना उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याच्या संधीही वाढल्या आहेत.

कमी वयातील लग्नामुळे मातामृत्यूचा धोका कमी करणे आणि महिलांची पोषण स्थिती सुधारणे हाही या निर्णयाचा उद्देश आहे. सीतारामन म्हणाल्या होत्या की, या संपूर्ण प्रकरणाकडे एका मुलीचे आई होण्याच्या वयात येण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

हेही वाचा: Crime: जाणुन घ्या, अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यावर, दोशीला कोणती शिक्षा होते,आणि कोणकोणते कलम,आणि कायदा लागू होतात……

पहिल्या मुलाला जन्म देतेवेळी महिलेचे वय हे २१ वर्षे असावे. लग्नाला उशीर झाल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

देशात सध्या मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे इतके आहे. पण, अठरा वर्षांपर्यंत मुलीची शारीरिक वाढही झालेली नसते. तसेच, तिच्या शैक्षणिक वाटचालीत खंड पडतो. त्यामुळे अठरा वर्षांपर्यंत तिचे ना शिक्षण पूर्ण होते ना तिची शारीरिक वाढ होते, त्यामुळे मुलीच्या लग्नाच्या वयात वाढ होण्याची गरज या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून बोलून दाखवली जात होती. 

Leave a Comment

updates a2z