Russia and Ukraine war: ( रशिया यूक्रेन युद्ध) युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे…..

 

रशिया यूक्रेन युद्ध ( Russia Ukrain War) : 
रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukrain War) सुरू झाल्यावर हे युद्ध 1 ते 2 दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच पेटत चाललंय.
रशिया ( Russia)आधुनिक शस्त्रे, बॉम्ब ( Modern weapons, bomb)आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. रशिया युक्रेनमध्ये हल्ले ( ukrain attacks)करत असून आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील सामान्य लोकही रशियन हल्ल्याचे बळी ठरले आहेत.आता युक्रेनमध्ये आता सामान्य नागरिकही युद्धासाठी तयार झाले आहे.
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आल आहे.
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आल आहे. मंगळवारी सकाळी खार्किवमध्ये करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.  खार्किवमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय मुलाचे नाव “नविन शेखरप्पा” (वय 21) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे.आज सकाळी खार्किवमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ( Indian student dead)झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून या रणभूमीत वास्तव्यास असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तिथे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. अतिशय भयानक परिस्थितीत विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत तिथे राहत आहेत.

Leave a Comment

updates a2z