Healthy tips: फ्रिजमधील पाणी आरोग्यास धोकादायक…उन्हाळयात फ्रजमधील पाणी पित असाल तर सावध रहा… होऊ शकतात आरोग्यावर परिणाम…..

 

:

 

सध्या उन्हाच्या काहिलीने जीव नको नकोसा होतो.. उन्हातून घरी गेलो, की अनेक जण फ्रिजमधील गारेगार पाणी पोटात ढकलतात.. गार पाण्यामुळे काही वेळ हायसं वाटत असलं, तरी आरोग्यासाठी फ्रिजमधलं थंड पाणी अजिबात चांगलं नाहीय.. त्याचे आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होऊ शकतात..

थंड पाणी पिण्याचे परिणाम (Consequences of drinking cold water)

लठ्ठपणा (Obesity) –

थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी आणखी घट्ट होऊन ती जाळण्यात समस्या येते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर थंड पाणी पिऊ नका. गरम पाणी तुमच्या शरीरातील चरबी सहज काढून टाकू शकते.

 

घसा खवखवणे (Sore throat) 

हेही वाचा: Healthy tips: कलिंगड (watermelon) खाताय…मग कलिंगड विकत घेताना `ही` ट्रीक (Trick) वापरून चांगलं कलिंगड खरेदी करा……..

फ्रीजमधील थंड पाण्यामुळे घसा खवखवल्याचंही ऐकलं असेल. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी अति थंड पाणी समस्या निर्माण करू शकतं. घसा खवखवणे, खोकला, इतर संसर्गाचा त्रास होऊ शकतो.

पचनक्रिया मंदावते (Slows down digestion) – 

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते, परंतु त्यापेक्षा कमी तापमानाचं खाल्ले किंवा प्यायल्यास तुमच्या शरीराला त्या तापमानाचे नियमन करण्यास अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्याचा परिणाम पचन व पोषकद्रव्ये (Digestion and nutrients) शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर होतो. पचनात समस्या निर्माण झाल्यास बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ, पोट फुगणे अशा समस्या उद्भवतात.

डोकेदुखी, सायनसचा त्रास (Headache, sinus trouble) –

थंड पाण्यामुळे ‘ब्रेन फ्रीझ’ची समस्या उद्भवू शकते. बर्फाचे पाणी पिल्यास किंवा जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने ही समस्या निर्माण होते. थंड पाणी मणक्याच्या  संवेदनशील नसांना थंड करते, त्याचा मेंदूवर परिणाम होतो व डोकेदुखी होऊ शकते.

 

हृदयाच्या गतीवर परिणाम (Effects on heart rate) 

हे पण वाचा: Health tips: उन्हाळ्यात या गोष्टी केल्याने जाणवणार नाही उन्हाळा… तसेच या पध्दतीने घ्या, उन्हाळ्यात त्वचेची काळजी!!!

:

शरीरात एक व्हॅगस मज्जातंतू () आहे, जो मानेद्वारे हृदय, फुफ्फुस व पाचन तंत्र नियंत्रित करतो. थंड पाणी प्यायल्याने नसा जलद थंड होतात. हृदयाचे ठोके (Heartbeat) व नाडीची गती कमी होते व हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

केंव्हा आणि कधी पाणी प्यावं..?(when to drink water)

उन्हाळ्यात, गरम किंवा कोमट पाणी (Hot or warm water) पिण्याऐवजी खोलीच्या तापमानानुसार किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ शकता. त्यामुळे तहानही भागेल नि शरीराचीही हानी होणार नाही. एरवी इतर ऋतुमध् ये कोमट पाणी प्यावे.

 

Leave a Comment

updates a2z