हेरवाड गावचा विकास: राज्य सरकारचा विधवा प्रथेबाबताचा परिपत्रकाद्वारे आव्हाहन (State Government’s Widow Practice Appeal)…….

 

 

महाराष्ट्रात ( Maharashtra) आजही महिलांविषयी अनेक अनिष्ट प्रथा (Undesirable practice) सुरु असल्याचे पाहायला मिळते.. त्यापैकीच एक म्हणजे, विधवा प्रथा..!

महाराष्ट्रातील विधवा महिलांविषयी अनिष्ट प्रथा : 

राज्यात आजही पतीच्या निधनानंतर (death of her husband) पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे, अशा प्रथा पाळल्या जातात.. विधवांवर अन्याय-अत्याचार (Injustice against widows) होतात. त्यांना अनेक बंधनातून जावं लागत असल्याचे पाहायला मिळतं..

कोल्हापूर एक आदर्श जिल्हा (Kolhapur is an ideal district) : 

कोल्हापुरात ( Kolhapur) आलेला महापूर नि नंतर कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक घरातील कर्ती माणसे गेली. कित्येक महिला विधवा झाल्या.. मात्र, या महिलांनी हार न मानता संकटाचा मुकाबला केला. मात्र, तरीही विधवांना समाजात मानसन्मान दिला जात नाही. ही बाब लक्षात आल्यावर हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथाच बंद करण्याचा निर्णय घेतला..

कोल्हापूर हा राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांचा ( Rajarshi chatrapati Shree Shahu Maharaj) जिल्हा.. राजश्री शाहू महाराजांनी विधवांसाठी ( For widow)  बहुमोल कार्य केलंय. त्याचीच जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव (Revolutionary decision resolution) केल्याचे सरपंच पाटील (Sarpanch Patil) यांनी सांगितले. हेरवाड ग्रामसभेच्या या ठरावाचे रुपांतर आता शासन निर्णयात झालेय.. हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न (Herwad Gram Panchayat Pattern) राज्यात राबविण्याचे आवाहन सरकारने ( Government) केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामसभेचा निर्णय (Decision of Herwad Gram Sabha in Kolhapur district) : 

हेही वाचा: Politics: पोलिस कारवाईनंतर “राज ठाकरे” ( Raj Thakare) यांचं पत्र जाहीर (Letter released), पत्रांतून कार्यकर्त्यांना आवाहन (Appeal)….

कोल्हापूर जिल्ह्यातील ( Kolhapur District) हेरवाड गावाने ( Herwad village) या साऱ्या प्रथा ( Practice) झुगारुन दिल्या.. हेरवाडच्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर (Pallavi Kolekar) व सरपंच सुरगोंडा पाटील ( Sarpanch Surgonda Patil) यांच्या पुढाकाराने ग्रामसभेने ( Gram sabha) गावातील विधवा प्रथा ( Widow practice) बंद करण्याचा ठराव (Resolution) केला.. ही बाब माध्यमांमुळे सगळीकडे झाली नि साऱ्यांनीच गावाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

ठाकरे सरकारचा निर्णय (Thackeray government’s decision) : 

अखेर ही बाब ठाकरे सरकारपर्यंत पोहोचली.. नि ठाकरे सरकारने ( Thakare Government) 17 मे 2022 रोजी शासन निर्णय (Ruling) जारी केला.. हेरवाड ग्रामपंचायतीने ( Herwad Gram panchayat) विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झालंय.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून काम करावं, असे आवाहन सरकारने परिपत्रकाद्वारे केलंय.

Leave a Comment

updates a2z