गोविंदांना सरकारी नोकरी देण्याबाबत काय आहे भाजपची भुमिका…? ‘हि’ अट घातली … वाचा सविस्तर बातमी…

दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जाहीर केला होता.. परंतु, या वर राज्यात टीका होऊ लागल्यानंतर भाजपने आता वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे..

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय…https://updatesa2z.com/2022/08/mpsc-update.html

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी गोविंदांना सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयावर वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, की “सर्वच गोविंदांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. फक्त शिकलेल्या गोविंदानाच त्यांच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरीत आरक्षण दिलं जाईल…!”

शिक्षणानुसार नोकरी

दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देताना, त्यांचे शिक्षण  लक्ष्यात घेतल जाईल. त्यांच्या शिक्षणाच्या आधारेच सरकारी नोकरीतील आरक्षणाचा  गोविंदांना लाभ मिळेल. सरसकट सगळ्याच गोविंदाना नोकरीसाठी आरक्षण मिळणार नाही अशी माहिती बावनकुळे यांनी दिली..

वाचा: काय मिळणार दहीहंडी पथकात सहभागी असणाऱ्यांना सुविधा

https://updatesa2z.com/2022/08/updates-about-dahihandi.html

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोविंदांसाठी सरकरी नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याची केली मात्र त्याच वेळी त्यांच्यासोबत सत्तेत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या घोषणेवरुन घुमजाव करीत असल्याचे दिसतंय. भाजपच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला काहीच महत्त्व नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे..

 

Leave a Comment

updates a2z