Government updates: Government-updates-about-Yogurt पुण्यामध्ये शिंदे सरकारच्या (Shinde Government)  दहीहंडी (Yogurt) उत्सवात दिग्दज नेत्यांची हजेरी, तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन होणार…!!

 

 

Government-updates

 

विविध पक्षातील नेत्यांकडून दरवर्षी राज्यभरात दहीहंडीच्या (Dahi handi) जंगी कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येते.

आता पुण्यात (Pune ) दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शिंदे गट (Eknath Shinde) शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.  शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे (Dahihandi Shinde group)  शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (City Chief Pramod Bhangire)यांनी आयोजित केली आहे, असे सांगण्यात येत आहे.

 

शिंदे गटाच्या दहीहंडीचे आयोजन (Dahihandi Organization): 

 

शहरातील सर्वात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे शहरप्रमुख ‘प्रमोद भानगिरे’ यांनी आयोजित केली आहे. पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे (Dharmavir Anand Dighe) दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. उत्सवाच्या माध्यमातून सात लाखांच्या रोख बक्षिसांसह विविध परितोषिकं दिले जाणार आहेत.

हे ही वाचाhttps://updatesa2z.com/2022/08/decision-of-central-government-aaple-guruji-will-be-implemented-in-schools.html

या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिगग्ज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Tanaji Sawant, Abdul Sattar, MLA Shahaji Patil, former MP Shivajirao Adharao Patil) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या दहीहंडी उत्सवात राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला दहीहंडी पथक (Dahi Handi Squad) सहभागी होणार असल्याची माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिलीये, या दहीहंडीच्या माध्यमातून शिंदे गट जोरदार शक्तिपदर्शन करणार आहे.

गोविंदा पथकाला विमा संरक्षण (Insurance cover for Govinda team) :

हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/08/important-decisions-of-narendra-modi-about-farming.html

दहीहंडी उत्सवादरम्यान अनेकदा विशाल थर लावले जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. खाली पडून गोविंदाला दुखापत होते, काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा घटना टाळल्या जाव्यात तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आता शासनाने गोविंदांसाठी दहा लाख रुपये विमा संरक्षणाची घोषणा केली आहे. या विम्याचा प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे.

Leave a Comment

updates a2z