

मोदी सरकारने ‘एनपीएस’,(नॅशनल पेन्शन सिस्टम)(अटल पेन्शन योजना)तसेच ‘एपीवाय’ बाबत मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, नागरिकांना आता आपल्या पेन्शन खात्यात ‘युपीआय'(UPI)द्वारे थेट पैसे जमा करता येणार आहेत.
खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे स्वतंत्र हॅण्डल :
http://PFRDA.15digitVirtualAccount@axisbank/
यूपीआय’द्वारे पैसे भरण्यासाठी हे स्वतंत्र हॅण्डल वापरायचं आहे….
‘एनपीएस’ (NPS) व ‘एपीवाय’ (APY) योजनांमध्ये ‘यूपीआय’द्वारे पैसे भरताना, ते ‘डायरेक्ट रेमिट’ (डी-रेमिट) अंतर्गत भरता येतील. ही सुविधा ‘टियर-1’ आणि ‘टियर-2’ खात्यांसाठी असेल. ‘डी-रेमिट’ करण्यासाठी ‘पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे स्वतंत्र हॅण्डल तयार केलं आहे.
पेन्शन खात्यांचे नियमन करणाऱ्या ‘पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणा’ने (पीएफआरडीए) नुकतीच याबाबतची घोषणा केली. आतापर्यंत या दोन्ही योजनांच्या खातेदारांना ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’, ‘आयएमपीएस’द्वारे नेटबँकिंग खात्याद्वारे पैसे भरता येत होते.. आता त्याची व्याप्ती वाढवल्याने ही प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार आहे.
तसेच, आता सकाळी साडेनऊ वाजण्याच्या आधी खात्यावर पैसे जमा केल्यास, हे योगदान त्याच दिवशी केलेली गुंतवणूक समजली जाणार आहे.. मात्र, त्यानंतर पैसे जमा केल्यास, ही रक्कम दुसऱ्या दिवशीपासून गुंतवणुकीसाठी मोजली जाणार आहे.. ‘पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे ही माहिती देण्यात आली.