नवी दिल्ली : भारताच्या चाहत्यांसाठी शनिवारी चांगलीच पर्वणी असणार आहे. कारण या एकाच दिवशी भारताने दोन संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी चाहत्यांना दोन क्रिकेटचे सामने पाहता
पहिला सामना हा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा ट्वेन्टी-२० सामना हा शनिवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिका खिश्यात
येऊ शकते. कारण आतापर्यंत या मालिकेत तीन सामने झाले आहे. या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजला एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने जर हा चौथा सामना जिंकला तर त्यांना मालिका विजय साकारता येऊ शकतो. भारताकडे मालिका जिंकण्यासाठी दोन संधी आहेत. चौथ्या सामन्यात जर भारताला विजय मिळवता आला नाही तर पाचव्या सामन्यात विजय मिळवून त्यांना मालिका जिंकता येऊ शकते. पण जर हे दोन्ही सामने त्यांनी गमावले तर वेस्ट इंडिजला मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने गाफिल न राहता विजय मिळवायला हवा. त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
हेही वाचा : 4ऑगष्ट ते13 आँगष्टपर्यंतचा नवीन अंदाज आला-पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज(panjab dakh havaman andaj)
दुसरा सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना राष्ट्रकुल स्पर्धेत खेळवला जाणार आहे. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने बार्बाडोसवर १०० धावांनी धडाकेबाज विजय साकारला. त्यामुळे भारताचा महिला क्रिकेट संघ हा उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडबरोबर खेळवण्यात येणार असून हा सामनाही शनिवारीच होणार आहे. त्यामुळे या सामन्यात जर भारताने विजय साकारला तर त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल आणि त्यांचे पदक निश्चित होईल. भारताने विजय साकारला तर त्यांना सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळू शकते. पण जर पराभव झाला तर त्यांच्याकडे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. त्यामुळे शनिवारच्या या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि तो अंतिम फेरीत पोहोचता की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शनिवारी होणारे हे दोन्ही सामने भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे धन्यवाद.