
राज्याच्या चालू पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत नेमके काय निर्णय घेतले आहेत, त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
हेही वाचा: पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल वाचा सविस्तर :https://updatesa2z.com/2022/08/pmkisan-update.html
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवशेनात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, तसेच विरोधकांकडून सातत्याने होणारी मागणी, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 23) अनेक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले..
शिंदे सरकारचे महत्वपूर्ण निर्णय
पूरग्रस्तांना 15 हजारांची मदत
राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आले होते.. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. पूर्वी पूरग्रस्तांना 5 हजारांची तात्काळ मदत दिली जात होती. मात्र, आता त्यात तिप्पट वाढ केली असून, सरकार आता पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची तात्काळ मदत देणार असल्याचे जाहीर करण्यात आले..
महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिलं जाणार आहे.. या अनुदानाचे वाटप सप्टेंबरपासून सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अन्य महत्वाचे निर्णय
कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच ज्या बँकेत विमा भरला आहे, अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील. तशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.
यलो मोझॅक’ (गोगल गाय) सारख्या कीड रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.
▪️ पाऊस व इतर हवामानाच्या नोंदीसाठी पूर्वी प्रत्येक 2400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र होते. आता स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.