जाणून घ्या कस मिळणार दोन दिवसात पॅन कार्ड

 

आतापर्यंत पॅन कार्ड (PAN) काढताना विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही पॅनकार्ड मिळविण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागतो.. मात्र, आता तसं होणार नाही.. तुम्हाला तातडीची गरज असल्यास, अगदी 48 तासांतही तुम्हाला पॅन कार्ड मिळवता येईल.. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Pancard-update

 

परमानंट अकाऊंट नंबर.. अर्थात पॅनकार्ड… आयकर विभागाकडून दिलं जाणारं महत्वाचं सरकारी कागदपत्रं.. आयकर रिटर्न भरायचा असो, वा बँकेत खाते उघडायचे असो.. आर्थिक व्यवहारांशी निगडीत प्रत्येक गोष्टीसाठी ‘पॅन कार्ड’ची मागणी केली जाते.. याशिवाय ओळखपत्र म्हणूनही नागरिकांना त्याचा वापर करता येतो..

      आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट छायाचित्र
  • आधार कार्ड,
  • ओळखपत्र किंवा मतदार ओळखपत्र

असं मिळवा पॅन कार्ड..

  • झटपट पॅन कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम ‘NSDL’च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • नंतर ऑनलाइन अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व अर्ज तपासून घ्या.
  • ऑफलाइन अर्ज भरायचा असल्यास, वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा व सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जवळच्या सेवा केंद्रात तो अर्ज सबमिट करा.
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला पावती क्रमांक मिळेल, ज्याच्या मदतीनं तुम्हाला अर्जाचा मागोवा घेता येईल. स्टेटसची माहिती मिळवता येईल.
  • त्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसांत घरपोच पॅन कार्ड मिळेल..
  • मात्र, नोंदणीकृत मेलवर केवळ दोनच दिवसांत आयकर विभागाकडून पॅन कार्ड प्राप्त होईल, जे तुम्ही आवश्यक कामांसाठी वापरू शकता.

हेही वाचा : काय झाल्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात घोषणा  वाचा:https://updatesa2z.com/2022/08/farmersupdate.html

असा करा ऑफलाइन अर्ज…

पॅनकार्ड काढण्यासाठी ऑफलाईन अर्ज करु शकता.. त्यासाठी NSDL/UTIITL वेबसाइटवरून पॅन अर्ज फॉर्म 49A मिळवू शकता किंवा UTITL प्रतिनिधीला विनंती करू शकता. त्यासाठी फॉर्म भरा व सबमिशन करण्यापूर्वी पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सबमिट करा.

Leave a Comment

updates a2z