
14 हजारापेक्षा जास्त कापूस बाजार भाव
कापसाला मिळणारा हा प्रचंड भाव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कापसाला भारतासह अंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी वाढत आहे. याचाच परिणाम म्हनून कापसाला प्रचंड भाव मिळत आहे.
हेही वाचा : रेशन कार्डधारकांसाठी शासनाचा निर्णयhttps://updatesa2z.com/2022/09/reshancardupdates.html
सध्या मिळत असलेला भाव लक्षात घेता भविष्यामध्ये यापेक्षा जास्त देखील मिळू शकतो. त्यामुळे जे शेतकरी कापूस उत्पादक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच या बातमीमुले स्मितहास्य निर्माण झाले असेल यात शंका नाही.
अर्थात हा कापूस खरेदीचा शुभारंभ असल्याने एवढा भाव मिळू शकतो. या भावामध्ये भविष्यामध्ये चढ उतार देखील होऊ शकतात. परंतु सध्या मिळणारा भाव लक्षात घेता याहीपेक्षा येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
यावर्षी कापसाला प्रचंड मागणी असल्याने कापसाचे दर तेजीत राहणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु ज्या पद्धतीने अंदाज लावण्यात आला होता त्यापेक्षा जास्त बाजारभाव कापसाला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे. कापसाला यावेळी १४,७७२ (चौदा हजार सातशे बहात्तर रुपये ) एवढा भाव मिळाला आहे.
कापसाला मिळतोय उत्तम भाव
कोणतेही पिक घेण्यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये राबराब राबत असतात. कापूस असोत कि इतर पिके त्यावर फवारणी करणे, खते, मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हैराण असतात. एवढे करूनही बळीराजा चांगले उत्पादन घेतो.