पाच दिवसात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच ५ दिवसाच्या आत शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे.

Farmerupdates

 

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.

हेही वाचा : काय झाल्या शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात घोषणा वाचा सविस्तरhttps://updatesa2z.com/2022/08/farmersupdate.html

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

 

 

Leave a Comment

updates a2z