जाणून घ्या, काय आहे “पिमश्री”(PM Shri scheme) योजना !!!!

Government-updates

शिक्षक दिन काल साजरा होताना पंतप्रधानांनी 5 सप्टेंबर या दिवशी काही घोषणा केल्या. त्यात ते म्हणाले, ” आज शिक्षण दिनानिमित्त मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना मोठा आनंद होत आहे.

PM Shri scheme announced by PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशभरातील 14,500 शाळांचा विकास व अपग्रेडेशन होणार आहे. देशात ‘पीएमश्री’ (PM Shri) ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेच्या माध्यमातून आपण देशातील तब्बल 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करणार आहोत. यामुळं ही मॉडेल स्कूल होतील ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) संपूर्ण आत्म्याचा समावेश होईल. शिक्षण पद्धती सुधारून आणखी मजबूत होईल”, असं ते म्हणाले.

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/08/government-updates.html

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं मागील काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे. ते पुढे म्हणाले, मला खात्री आहे की PM-SHRI शाळांचा राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं (NEP) भारतातील लाखो-करोडो विद्यार्थ्यांना आणखी मोठा फायदा मिळेल. PM-SHRI शाळांमध्ये शिक्षणाची नवीन, बदल घडवणारी आणि सर्वांगीण विकास करणारी पद्धत असेल.

 

हे पण वाचा:https://updatesa2z.com/2022/08/decision-of-central-government-aaple-guruji-will-be-implemented-in-schools.html

दरम्यान शोध केंद्रीत शिक्षण पद्धतीवर अधिक भर दिला जाईल. अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि आणखी खूप काही या नव्या योजनेंतर्गत येईल. तसेच शाळांमधील आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रीत केलं जाईल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Comment

updates a2z