जनावरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : दिवसेंदिवस देशभरासह राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारने 50 लाख लसींची ऑर्डर देण्यात आली आहे.

Lasikaran-updats

राज्यामधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आल्याने लप्मी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांत बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे.

हेही वाचा : डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना https://updatesa2z.com/2022/09/educational-updates-dr-panjabrao-deshmukh-hostel-scheme.html

सोमवार-मंगळवारपर्यंत राज्यात 50 लाख लस उपलब्ध होणार आहेत. या लसींचं जिल्हानिहाय वाटप केलं जाणार आहे. संशयित असलेल्या किंवा संक्रमित प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विविध जिल्हा शासनाने सूचना दिलेल्या आहेत.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यानंतर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. योग्य औषध उपचार केल्याने बाधित जनावरे दोन ते तीनआठवड्यात पूर्णपणे बरी होत आहेत.

Leave a Comment

updates a2z