पुण्यात उडत्या बसेसची योजना! वाहतुकीच्या समस्येवर गडकरींचा अद्वितीय उपाय

पुण्यात उडत्या बसेसची योजना! वाहतुकीच्या समस्येवर गडकरींचा द्वितीय उपाय

वाहतुकीची समस्या हा सध्या प्रत्येक मोठ्या शहरातला गंभीर प्रश्न ठरला आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी भन्नाट उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली, तर पुण्यातल्या वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं गडकरी म्हणाले आहेत. चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडकरींनी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी उडत्या बसेसचा उल्लेख केला.

चार मजली रस्त्यांची योजना!

पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्राफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

Leave a Comment

updates a2z