जंगलात सापडले तब्बल 40 माकडांचे मृतदेह सर्वत्र खळबळ

जंगलात सापडले तब्बल 40 माकडांचे मृतदेह

सर्वत्र खळबळ

 

 

 

 

 

 

सद्या जंगलाचे प्रमाण कमी होत असताना वन क्षेत्रातून प्राणी हे मानव वस्तीकडे येत आहेत. त्यात मानवाने जंगल प्रणालिमध्ये हस्तक्षेप केला आहे त्यामुळे त्याने जंगलातील प्राणी यांच्या जीवनावर मोठा विपरीत परिणाम झालेला आहेत. अशीच एक घटना भारतामध्ये आंध्र प्रदेश मध्ये घडली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत. तरी सखोल चौकशी होणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले आहेत. आणि प्राणिमात्रांवर होणाऱ्या या घटना थांबवणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: पाणी पुरवठा योजनेस 38 कोटी मंजूर वाचा संपूर्ण माहिती

 

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जंगलात माकडांचे शव सापडले. येथे सुमारे 40 ते 45 माकडांचे मृतदेह आढळून आले आहेत.

हेही वाचा: देशातली पहिली इथेनॉल कार लाँच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिलगाम गावाच्या जंगलात ४० माकडांचे मृतदेह सापडले आहेत. या माकडांना विषबाधा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेबाबत श्रीकाकुलम कासीबुगा (Kasibugga Forest) वन अधिकारी मुरली कृष्णन म्हणाले, “आम्ही जिल्ह्यात अशी कोणतीही घटना पाहिली नाही. या माकडांना कोणीतरी ट्रॅक्टरने आणले आणि जंगल परिसरात (Srikakulam Forest) फेकून दिले. आम्ही येथून सुमारे 40-45 माकडांचे शव जप्त केले आहेत.

हेही वाचा: जमिनीचे कागदपत्र हरवले असता करा हे काम नाहीतर बसेल मोठा फटका

 

एवढ्या मोठ्या प्रमाणात माकडांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर मुरली कृष्णन पुढे म्हणाले, ‘या माकडांचे पोस्टमार्टम केले जाईल. त्यानंतर 5 दिवसात पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल. प्राणी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपी कोण आहेत, ते लवकरच पकडले जातील. या माकडांचे शव येथे कोणी ठेवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

updates a2z