Cricket Updates: जाणून घ्या, टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुल (KL Rahul) यांची जागा कोण घेणार?

Cricket-updates

सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या सलामीच्या जोडीने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत, परंतु ही सलामीची जोडी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) एकदमच फ्लॉप झाली आहे.

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/10/shrilanka-vs-pakistan.html

आता न्यूझीलंड दौऱ्यावर सलामीसाठी त्यांच्या जागी दोन धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरु शकतात.  हे खेळाडू स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत.

कोण आहेत ते खेळाडू?

1. शुभमन गिल (Shubman Gill):

शुभमन गिल (Shubman Gill) याला सलामीची संधी मिळाली. निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो खराही ठरला.

गिलच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे. 23 वर्षीय हा खेळाडू मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.

आयपीएल 2022 मध्ये त्याने गुजरात टायटन्सला स्वबळावर विजेतेपद मिळवून दिले होते.

गिलने भारतासाठी 11 टी-20 सामन्यांमध्ये 579 धावा आणि 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 579 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.

2. ईशान किशन (Ishan Kishan):

गेल्या काही काळापासून ईशान किशन (Ishan Kishan) याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. जर त्याने शुभमन गिल याच्यासोबत सलामीला आला तर चांगली जोडी जमेल. त्यामुळे गोलंदाजी करताना विरोधी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघात इशान किशन याला स्थान दिले आहे. त्याने भारतीय संघासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 267 धावा, 19 टी-20 सामन्यात 545 धावा केल्या आहेत.

 

 

Leave a Comment

updates a2z