मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कसा मिळवायचा घ्या जाणून

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

कसा मिळवायचा घ्या जाणून

 

 

 

 

 

 

20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते, यामध्ये हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुस प्रत्यारोपण, हात प्रत्यारोपण इत्यादींचा समावेश आहे. विविध शासकीय योजनांमधून मदत न मिळालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने आवश्यक कागदपत्रांची यादी आणि ज्या आजारांसाठी आर्थिक पैसे मिळू शकतात त्यांची यादी जाहीर केली आहे. मदतीसाठी अर्ज कसा करायचा याचीही माहिती सरकारने दिली आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत मदत न मिळालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते.

 

या आजारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी मिळणार अर्थसहाय्य

 

– कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)

– हृदय प्रत्यारोपण

– यकृत प्रत्यारोपण

– किडनी प्रत्यारोपण

– बोन मॅरो प्रत्यारोपण

– फुफ्फुस प्रत्यारोपण

– हाताचे प्रत्यारोपण

– हिप रिप्लेसमेंट

– कर्करोग शस्त्रक्रिया

– अपघात शस्त्रक्रिया

– लहान बालकांची शस्त्रक्रिया

– मेंदूचे आजार

– हृदयरोग

– डायलिसिस

– अपघात

– कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

– नवजात शिशुंचे आजार

– गुडघ्याचे प्रत्यारोपण

– जळालेले रुग्ण

– विद्युत अपघात रुग्ण

 

अर्ज करावा

 

ईमेल आयडी:- आर्थिक सहाय्यासाठी aao.cmrf-mh@gov.in वर अर्ज करा. कागदपत्रे PDF स्वरूपात पाठवावीत. पीडीएफ दस्तऐवज वाचनीय असावेत. तसेच ही कागदपत्रे पोस्टाने मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात पाठवावीत. कोणतीही अडचण आल्यास टोल फ्री क्र. 8650567567 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

आर्थिक मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे

 

अर्ज (विहित नमुन्यात)

निदान आणि उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत ते सिव्हिल सर्जनने प्रमाणित केले पाहिजे.) तहसीलदार कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला. (उत्पन्न 1.60 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.)

रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्य), मुलासाठी आवश्यक असलेल्या आईचे आधार कार्ड (बालरोग रुग्ण).

रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्य)

संबंधित आजाराचा अहवाल आवश्यक आहे.

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी अहवाल आवश्यक आहे.

प्रत्यारोपणाच्या रुग्णांसाठी ZTCC गव्हर्निंग कमिटीची परवानगी आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयातील संगणक प्रणालीवर रुग्णालयाचे रेकॉर्ड असल्याची खात्री करावी.

Leave a Comment

updates a2z