महाराष्ट्रात नव्या प्रकल्पाची 35000 कोटीची गुंतवणूक 11 क्षेत्रात नवीन रोजगार

महाराष्ट्रात नव्या प्रकल्पाची 35000 कोटीची गुंतवणूक

11 क्षेत्रात नवीन रोजगार

 

 

 

 

 

मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. आता लवकरच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. हिंदुजा समूह महाराष्ट्रात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रात लवकरच मोठे उद्योग येतील, अशी घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्यानुसार घडामोडी पाहिल्या जात आहेत. हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहे.

 

हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. नुकताच हिंदुजा समूह आणि राज्य सरकार यांच्यात यासंदर्भात एक करार झाला.

 

हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. नुकताच हिंदुजा समूह आणि राज्य सरकार यांच्यात यासंदर्भात एक करार झाला. महाराष्ट्रातील लोकांसाठी संधी आणि रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे घ्या जाणून संपूर्ण माहिती

हिंदुजा समूहाने गुरुवारी महाराष्ट्रातील विविध 11 क्षेत्रांमध्ये सुमारे 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला.

 

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या बैठकीत हिंदुजा गटाचे जी.पी. हिंदुजा, अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: शिबील स्कोअर(cibil score) कसा तपासला जातो? पहा सविस्तर

मंत्रिमंडळ उपसमितीने दोन दिवसांपूर्वी 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यातून 55 हजारांहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. आम्ही सरकारी विभागात 75 हजार नोकऱ्या देत आहोत. या गुंतवणुकीमुळे खासगी क्षेत्रातही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या गुंतवणुकीद्वारे हिंदुजा समूह अक्षय ऊर्जा, मीडिया आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, नवीन पिढीचे व्यावसायिक वाहन, BFSI, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान यासह 11 विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

3 thoughts on “महाराष्ट्रात नव्या प्रकल्पाची 35000 कोटीची गुंतवणूक 11 क्षेत्रात नवीन रोजगार”

Leave a Comment

updates a2z