घरबसल्या चेक करा आपल्या जमिनीचा सरकारी भाव घ्या जाणून माहिती

घरबसल्या चेक करा आपल्या जमिनीचा सरकारी भाव

घ्या जाणून माहिती

 

 

 

 

शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेतीच्या जमिनीतून होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सरकारी जमिनीचे दर माहित असणे गरजेचे आहे. अनेक वेळा शेतकरी बांधवांच्या जमिनी सरकारी प्रकल्पांमध्ये संपादित केल्या जातात. यासोबतच तुम्ही या लेखात दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून शेती, बागायती, एमआयडीसी अंतर्गत जमीन, महामार्गावरील जमिनीचे सरकारी दरही तपासू शकता. लक्षात घ्या की या वेबसाइटवरील जमिनीचे दर मूल्यांकन श्रेणीनुसार आहेत, म्हणजे प्रति हेक्टर आकार कसे आहेत.

 

 

अशा स्थितीत संबंधित जमीनमालक किंवा शेतकऱ्यांना सरकारी दरापेक्षा जादा दर दिला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घेणे उपयुक्त ठरते. हा सरकारी दर जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चौकशी करायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, कारण आजच्या स्मार्टफोनच्या युगात शेतजमिनीचे सरकारी भाव जाणून घेणे अगदी सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर फक्त पाच मिनिटांत सरकारी दर ऑनलाइन पाहू शकता. चला तर मग आज जाणून घेऊया शेतजमिनीची सरकारी किंमत कशी तपासायची.

हेही वाचा : शिबील स्कोअर(cibil score) कसा तपासला जातो? पहा सविस्तर

 

शेतजमिनीचा सरकारी भाव पाहण्यासाठी खालील पद्धत वापरा

 

सरकारी जमिनीचे दर तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

वेबसाईटला भेट दिल्यानंतर, Important Links या पर्यायातील Income Assessment या पर्यायावर क्लिक करा.

हेही वाचा : विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ? जाणून घ्या

एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जमिनीची किंमत जाणून घ्यायची आहे ते निवडा.

यानंतर वर्ष निवडावे लागते. उजव्या बाजूला असलेल्या भाषा पर्यायावर जाऊन तुम्ही भाषा देखील निवडू शकता.

त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या जिल्ह्याचे नाव दिसेल आणि पुढे तुम्हाला तालुका आणि गावाचे नाव निवडावे लागेल.

त्यानंतर गावाचे नाव निवडा आणि तुम्हाला खाली जमिनीची सरकारी किंमत दिसेल.

2 thoughts on “घरबसल्या चेक करा आपल्या जमिनीचा सरकारी भाव घ्या जाणून माहिती”

Leave a Comment

updates a2z