21 वर्षानंतर भारताला मिस वर्ल्ड चा किताब सरगम कौशल बनली मिस वर्ल्ड

21 वर्षानंतर भारताला मिस वर्ल्ड चा किताब

सरगम कौशल बनली मिस वर्ल्ड

 

 

 

 

 

 

 

मिसेस वर्ल्ड 2022 ची घोषणा झाली आहे. त्यामुळे नव्या मिसेस वर्ल्डची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम ​​कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. भारताच्या सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर खूप प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

भारतीय तरुणी सरगम ​​कौशलने 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. 2001 मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते. वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे शनिवारी मिसेस वर्ल्ड 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिसेस वर्ल्ड ऑफ अमेरिका शैलीन फोर्ड यांनी सरगम ​​कौशल्याचा मुकुट घातला.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये जुपण्याची शक्यता

मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप तर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे मिसेस इंडिया स्पर्धेने रविवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा केली. पोस्ट जाहीर करताना, ‘दीर्घ प्रतीक्षा संपली, 21 वर्षांनंतर ताज आमच्यासोबत!’ अस लिहल होत.

हेही वाचा: लहान मुलांचा बौद्धिक विकास कसा करायचा? घ्या जाणून महत्त्वाच्या गोष्टी

मिसेस वर्ल्ड बनल्यानंतर सरगम ​​कौशल म्हणाली, ’21 वर्षांनंतर भारताला हा मुकुट परत मिळाला आहे. मी खूप उत्सुक आहे. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सरगम ​​कौशल गुलाबी गाऊनमध्ये दिसत असून मिसेस इंडियाचा मुकुट जिंकल्यानंतर सरगमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, फॅशन डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता.

Leave a Comment

updates a2z