Mansoon-update

IMD Mansoon Update of Maharashtra

हवामान विभागांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार या आठवड्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. परंतु पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. चक्रीवादळामुळे दूर लोटलेला पाऊस आणखीन काही दिवस रखडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी येत्या काही दिवसात पेरणी करताना काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आलेला आहे.

तळ कोकणामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे परंतु महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजून पाऊस झालेला नाही त्यामुळे राज्यातील बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागांमध्ये पाऊस होण्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

यंदा पाऊस लांबला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

यंदा भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेत उशिरा पावसाची हजेरी झाली त्यातच बिपरजॉय चक्रीवादळ हजर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे देशात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशात मान्सूनचे आगमन होते परंतु यावर्षी मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होती. आता निम्मा जून महिना संपला तरी महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत कारण जर जून महिन्यात पावसाला विलंब झाला तर संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम दिसून येतो.

updates a2z