Rashan-card-update

शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत मंत्रालयीन बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता रेशन दुकानात जाण्याची गरज लागणार नाही, तर फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे.

📌मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. दरम्यान जे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी कोणालाही अन्न धान्यापासून वंचित ठेवू नका असे आदेश चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्या्ंना दिले आहेत.

updates a2z