चांगली बातमी समोर आली आहे खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने कात टाकून माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरल्यामुळे एसटी महामंडळाच्या डिजिटल तिकीट आरक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
मात्र सध्या ऑनलाईन एसटीचे तिकीट बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिकीट बुक करत असताना महामंडळाची वेबसाईट अनेकदा बंद पडते, तर कधी वेबसाईटवरून तिकीट बुकिंग करताना प्रवाशांच्या खात्यातून अनेकदा रक्कम म्हणजे पैसे तर कापले जातात मात्र सीट आरक्षित होत नाही म्हणजेच सीट बुक होत नाही.
मात्र खात्यातून कापले गेलेले पैसे म्हणजे कट झालेले पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो कितीतरी हेलपाटे मारावे लागतात याशिवाय आरक्षित जागा असलेल्या एसटी बसेस अनेकदा तिकीट आरक्षित करण्यासाठी उपलब्ध नसतात तसेच तिकीट बुक केल्यानंतर चुकीच्या सीट क्रमांकाच्या तक्रारी देखील बऱ्याच प्रवाशांनी केला आहे.
अशा एक ना अनेक अडचणी प्रवाशांना येत आहेत मात्र आता या कटकटी पासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षण आता सहज व सोप्या पद्धतीने मोबाईल फोन द्वारे घरबसल्या करता यावे, त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाकडून एक प्रवासी सुविधा तयार करण्यात येत असून या ॲपद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहे ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चेन्नई यांनी एका कार्यक्रमात दिली आहे .
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या नवीन ॲपवरून प्रवाशांना आरक्षित सीट क्रमांक एसटी बस ची संपूर्ण माहिती त्याचबरोबर तुमची एसटी बस नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, सध्या कुठे आहे, व आपल्या थांब्यावर कधीपर्यंत येणार आहे हे देखील एका क्लिकवर पाहता येणार आहे.
त्यामुळे एसटी बसची तासंतास वाट पाहत बसावे लागणार नाही व त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना केवळ डेविड क्रेडिट, क्रेडिट कार्ड, द्वारे नाही तर आपल्या मोबाईल फोनवर उपलब्ध असलेल्या पेटीएम, गुगल पे, व इतर मोबाईल कॉलेजच्या माध्यमातून एसटी बसचे तिकीट बुक करताना पेमेंट करता येणार असल्याची माहिती श्रीसेकर चेन्नई यांनी दिली आहे.
आता एसटीच्या प्रचारासाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने आता कात टाकायला सुरुवात केली आहे .
एसटी महामंडळाकडून राज्यभरामध्ये टप्प्याटप्प्याने नवीन ही व सेवा सुरू करण्यात येत आहे डिझेल वरील कोट्यावधी रुपयांचा खर्च कमी करून राज्यातील प्रवाशांना दर्जेदार व चांगली सेवा पुरवली जाणार आहे कोणताही आवाज न करता सुसाट वेगाने धावणाऱ्या या नवीन इलेक्ट्रिक बसेस मध्ये प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायक व सुखकारक होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सोलापूर व नागपूर भागाला नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत ,नागपूर विभागाला १९६ नवीन इलेक्ट्रिक बसेस येण्याची शक्यता आहे, तर सोलापूर विभागाने एसटी महामंडळाकडे सोलापूर साठी 75 नवीन ई बस गाड्या घ्याव्या असा प्रस्ताव पाठवला आहे .
सध्या पंढरपूरसाठी 25 व मंगळवेढ्यासाठी 25 तर सोलापूर साठी 25 बस गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली गेली आहे.
पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा या महिन्याच्या अखेर पर्यंत म्हणजे 30 जून पर्यंत मुंबई पुणे मार्गावर आणखी 100 नवीन इलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन कडून देण्यात आली आहे , तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई पुणे मार्गावर 60 नवीन शिवनेरी बस गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.
- ऑक्टोबर 2019 मध्ये पुणे मुंबई शिवनेरी एसी बसचे तिकीट भाडे 75 रुपयांनी वाढवण्यात आले होते त्यावेळी तिकीट भाडे चारशे पन्नास रुपयांवरून पाचशे पंचवीस रुपये करण्यात आले होते, मात्र आता प्रवाशांना तिकीट भाड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण मीडिया रिपोर्ट नुसार येत्या काळात मुंबई पुणे शिवनेरीवरचे तिकीट भाडे 350 रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी माहिती आहे तिकीट कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मान्यता मिळाल्यानंतर 350 रुपये तिकीट भाडे लागू केले जाण्याची शक्यता आहे यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार