Trai important update

अशातच केंद्र सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात TRAI  सर्व टेलिकॉम कंपन्यांना जसे की जिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांना एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे मागील काही दिवसांमध्ये फ्रॉड म्हणजेच फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून मोबाईल धारकांना आपले टार्गेट करत आहेत. आत्तापर्यंत मोबाईल धारकांना म्हणजे मोबाईल वापरणाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना या सायबर चोरट्यांनी हजारो लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

सध्या सायबर चोरट्यांच्या टोळ्यांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढले आहे या सायबर गुन्हे  अनेक लोकांची व मोबाईल वापरकर्त्यांची बँक खाते देखील रिकामी करून टाकली आहे.

यामुळेच केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटर ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने कॉलिंग आणि एसएमएस म्हणजेच मेसेज बाबतच्या नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे .बनावट व फेक कॉल व त्रासदायक कॉल म्हणजेच सतत त्रास देणारे कॉल आणि एसएमएस चा धोका थांबवण्यासाठी एक नवीन नियम बनवला आहे. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाने सेवा  जसे की विविध बँका ट्रेडिंग कंपन्या फायनान्स कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या ,सोबतच रियल इस्टेट कंपन्या मार्केटिंग कंपन्या यांना आता कॉल आणि एसएमएस म्हणजेच मेसेज करण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांची म्हणजेच ग्राहकांची संमती मिळवण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी येत्या दोन महिन्याच्या आत एक  डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत .

पहिल्या टप्प्यात ग्राहक केवळ प्रमोशनल म्हणजे जाहिरात कॉल आणि एसएमएस प्राप्त करण्यासाठी आपली संमती नोंदवू शकतील म्हणजेच परमिशन देऊ शकतील असे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडियाने म्हणजे काय म्हटले आहे याबाबतीत केंद्र सरकारने म्हणजेच ट्रायने शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी केले आहे.

भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाने सर्व ॲक्सेस पुरवठादारांना अशा सुविधा विकसित करण्यासाठी आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी फक्त साठ दिवस म्हणजेच दोन महिन्यांचा वेळ दिला आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रमोशन जाहिरात कॉल ची वेगळी ओळख असेल. जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया यासारख्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना संमती म्हणजे परमिशन मागणारे मेसेज पाठवण्यासाठी वन टू सेवन म्हणजेच 127 ने सुरु होणारा कॉमन शॉट कोड वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

आता एअरटेल रिलायन्स जिओ वोडाफोन आयडिया आणि bsnl सारख्या टेलिकॉम कंपन्यांना बँकिंग सेवा व मार्केटिंग साठी स्वतंत्र क्रमांक जारी केले जातील यामुळे मोबाईल युजर्सना म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांना मोठा विलासा मिळणार आहे कारण की यामुळे त्यांना बँकेचे आणि प्रमोशनल कॉल्स म्हणजे जाहिराती आणि इतर मार्केटिंग कंप न्यांचे कॉल त्याशिवाय इतर फेक बनावट व फसवणूक करणारे कॉल सहज ओळखता येतील यामुळे दररोज घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर देखील आळा बसेल.

updates a2z