Shet Rasta Kayda Today News शेत रस्त्यासाठी सरकारने घेतले मोठे निर्णय!हे नियम न पाळल्यास मिळणार नाही शेत रस्ता! शासन निर्णय पहा.

अर्जदाराला नवीन शेत मार्ग दिल्यानंतर जवळील शेतकऱ्याला म्हणजेच शेजारील शेतकऱ्याला कमीत कमी असे नुकसान होईल हे सुद्धा पाहणे तहसीलदारला गरजेचे असते.या सर्व गोष्टीची पूर्णपणे पडताळणी करूनच या अर्जदाराला नवीन रस्ता देणे गरजेचे आहे याची खात्री झाल्यानंतरच तहसीलदार अर्जदाराचा जो अर्ज असतो तो अर्ज मंजूर केला जातो.

 

जर याच्या उलट काही निदर्शनास आले तर तर तो अर्ज हा फेटळला जातो जर अर्ज मान्य झाल्यावर नवीन मार्ग देताना दोन्ही बाजूने चार चार फूट म्हणजेच आठ फूट रुंदीचा पायवाट ही काढून दिली जाते.

 

सगळ्यांच्या संमतीने रस्त्याची जी रुंदी असते ती कमी जास्त करू शकतात जर अर्जदाराने गाडी रस्ता हा मागितला असेल तर हा रस्ता देताना म्हणजेच गाडी रस्ता देताना सरासरी आठ फूट ते बारा फूट रुंदीचा हा देण्यात येतो.

 

पण यापेक्षा जास्त रुंदीचा रस्ता अर्जदाराने मागितला तर लगतच्या शेतकऱ्याकडून स्वतःचे हक्क नोंदणीकृत खरेदी दस्त करून विकत घेणे हे आवश्यक असते.

updates a2z