मुंबईने गुजरातवर तब्बल 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. साधारणपणे इतक्या धावांचं टी 20 क्रिकेटमध्ये आव्हान दिलं जातं. मात्र मुंबईने इतक्या धावांनी सामना जिंकला. मुंबईने या कामगिरीसह मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड वूमन्स बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सच्या नावावर होता.

पर्थ स्कॉचर्सने 2022 मध्ये मेलबर्न रेनेगेड्सवर 104 धावांनी विजय मिळवला होता. याआधी 100 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने फक्त 2 संघांनाच विजय मिळवता आला आहे.

दुसरी सर्वोच्च धावसंख्यामुंबईने या सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. वूमन्स टी 20 क्रिकेट लीगच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी 2017 मध्ये सिडनी सिक्सर्सने मेलबर्न स्टार्स विरुद्ध 4 विकेट्स गमावून 242 धावा केल्या होत्या.

गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. मुंबईने धुव्वाधार बॅटिंग करत 207 धावा केल्या. यामुळे गुजरातला विजयासाठी 208 धावांचं आव्हान मिळालं.

गुजरात विजयी धावांचं पाठलाग करायला मैदानात आली. मात्र मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर एकालाही मैदानात तग धरता आला नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 15.1 ओव्हरमध्ये 64 धावांवर गुंडाळलं.

गुजरातकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तर मोनिका पटेलने 10 रन्स केल्या. गुजरातच्या 4 जणींना भोपळाही फोडता आला नाही. या शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

सब्बीनेनी मेघना ही 2 धावा करुन तंबूत परतली. मानसी जोशी आणि अनाबेल सुथरलँड या दोघींनी 6 धावा केल्या. जॉर्जिया वारेहम ही 8 धावा करुन आऊट झाली. स्नेह राणाने फक्त 1 धावा केली. तर मुंबईकडून सायका इशाक हीने 4 विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्स महिला संघ | हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता आणि सायका इशाक.

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी आणि मोनिका पटेल.

 

 

 

updates a2z