जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना फरक काय घ्या जाणुन

जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना फरक काय घ्या जाणुन

 

 

 

 

राज्यात सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यात नेमका काय फरक आहे? जुन्या पेन्शनमध्ये पगार 30 हजार, पेन्शन 15 हजार असून पगारातून कोणतीही कपात करण्यात आली नाही, मात्र नवीन पेन्शनमध्ये पगार 30 हजार व पेन्शन 2700 रुपये असून दरमहा पगारातून कपात करण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेत ग्रॅच्युईटी, जीपीएफ, महागाई भत्ता आणि वारसा निवृत्ती वेतन दिले जात होते, परंतु नवीन पेन्शन योजनेत यापैकी कोणतीही सवलत दिली जात नाही आणि ती बंद करण्यात आली आहे. नवीन आणि जुन्या पेन्शन योजनेत आणखी काय वेगळे आहे ते पाहा.

 

 

जुनी पेन्शन योजना

या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्यावेळी पेन्शन म्हणून दिली जाते.

या योजनेत 2p लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम उपलब्ध आहे.

जुन्या पेन्शन योजनेत पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केले जाते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पेन्शनची रक्कम मिळते.

जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही.

सहा महिन्यांनंतर डीए (महागाई भत्ता) मिळण्याची तरतूद आहे.

 

नवी पेन्शन योजना

नवी पेन्शन योजना भारत सरकारने 2004 पासून लागू केली आहे.

या योजनेअंतर्गत निवृत्तीच्यावेळी कर्मचारी एनपीएस फंडातील 60 टक्के रक्कम काढून घेऊ शकतात.

नव्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 10 टक्के अधिक डीए कापला जातो.

निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते.

निवृत्तीनंतर पेन्शनची निश्चित हमी नाही.

नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे येथे कराची तरतूद नाही.

updates a2z