राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात एवढ्या % नी वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार  टक्के महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय केली गेली आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र अद्याप राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना तूर्तास 34 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळत आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ मिळावी यासाठी कामगार संघटनेकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना, पगार 75,000 रुपये, येथे अर्ज करा

दरम्यान आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या  दाव्यानुसार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ अपेक्षित आहे. आता, राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विचार होऊ शकतो असे देखील मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत,

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

येथे क्लिक करा

दरम्यान, राज्य वित्त विभागाच्या डी. ए वाढीच्या प्रस्तावामध्ये राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता देखील 38 टक्के एवढा होणार आहे. या महागाई भत्ता चा वाढ जुलै महिन्यापासून अनुज्ञेय होणार असल्याने जुलै महिन्यापासूनची थकबाकी देखील राज्य कर्मचाऱ्यांना वितरित होणार आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

updates a2z