शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! तब्बल 14 कोटी शेतकऱ्यांना होणार थेट फायदा, जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत व्हावी यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात.त्याचबरोबर सरकार विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते. आताच आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे देशांमधील तब्बल 14 कोटी शेतकऱ्यांना  थेट लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ होणार आहे.शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे आवश्यक

सातत्याने हवामानामध्ये बदल होताना दिसून येत आहेत. हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. मुळे शेतकऱ्यांना शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा आणि संशोधनाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकरी या नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकाची देखभाल करू शकतात. त्याचबरोबर पिकाचे नुकसान झाले नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसणार नाही.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 94 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शेतीतील नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यावर भर दिला. त्याचवेळी बोलताना ते म्हणाले की, “कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या कृषी क्षेत्राचा विकास जलद गतीने झाला पाहिजे.” म्हणूनच देशांमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.

“हवामान बदलासारखी आव्हाने आज आपल्यासमोर आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करण्याचे आव्हानही आपल्यासमोर आहे. नव्या भारतात नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे आहे.” त्याचबरोबर त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्याकरता ICAR शास्त्रज्ञांच्या योगदानाचे कौतुक देखील केले. 2047 पर्यंत अधिक संशोधन प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

updates a2z