30 हजार शिक्षक भरतीत अडचणी काय आहे उमेदवारांचे मत घ्या जाणून
जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार नवीन शैक्षणिक वर्षात 30 हजार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
तसेच राज्यातील खासगी शाळांच्या बाबतीत राज्यात जे वातावरण तयार केले जात आहे ते चुकीचे आहे असे दीपक केसरकर आणि सांगितले आहेत त्यांनी मीडिया शी बोलताना सांगितले आहे की ते एक ही शाळा बंद पडू देणार नाही उलट ज्या शाळा मागे राहिल्या त्यांचा विकास करण्यात येणार आहेत. तसेच नवीन शिक्षण प्रणाली नुसार शिक्षण क्षेत्रात नवीन प्रगती होईल असे ते बोले.
राज्य सरकार हे शिक्षणाच्या बाबतीत कोणतेही निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ही त्यांनी ग्वाही दिली. राज्यात मागील काही दिवसापासून खासगी शाळा सरकार विलीन करून घेणार अशी माहिती समोर येत होती पर्यांतू असे काही करणार नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहेत.