शासन देत आहे प्रति एकर 50 हजार रुपये घ्या जाणुन शासन निर्णय
सरकारने घोषणा केली होते की, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर म्हणून 50 हजार रुपये सरकारकडून दिले जाणार. आणि याचीच तरतूद आता 2022-23 मध्ये करण्यात आली आहे.
त्यानुसारच आता नियमित कर्ज माफी अनुदान यादी जाहीर झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली असेल तर शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 हजार रुपये कर्जमाफी अनुदान मिळणार आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. आताच्या सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदतीवर कर एक कर्ज घेतले आहे. आणि त्याची नियमितपणे परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने काल दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय (जीआर) प्रकाशित करण्यात आला. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 2350 कोटी रुपये इतका निधी वितरित केले असल्याचे नमूद केले आहे. आता ही रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यावर आता शासनाने ही रक्कम वितरित करण्याची मान्यता सुद्धा दिली आहे. यासंबंधीची सर्व माहितीसाठी शासन निर्णय (GR) ची लिंक खाली दिली आहे तेथे जाऊन तुम्ही यासंबंधीची सर्व माहिती पाहू शकता.
GR वाचण्यासाठी इथे क्लिक करा https://drive.google.com/file/d/1J3SYARDE3RIuhueRl6NJc4X0HXfqJUBt/view?usp=drivesdk