अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.

 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.

 मराठा आर्थिक विकास महामंडळ मर्यादित- कर्ज योजना 2023. महामंडळ कर्ज योजना माहिती.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या; अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित; या महामंडळामार्फत, मराठा समाजातील तरुणांना दहा लाख रुपयांपर्यंत बिगर व्याजी कर्जपुरवठा केला जातो.

मराठा समाजातील बेरोजगार तसेच सुशिक्षित तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कमी व्याजदरांमध्ये कर्ज पुरवठा केला जातो.

या महामंडळामार्फत पुढील प्रकारे कर्जपुरवठा केला जातो.

1 ) गट कर्ज व्याज परतावा योजना.

2 ) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.

३ ) प्रकल्प कर्ज योजना.

आवश्यक कागदपत्रे

आणि अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

वरीलपैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याबद्दल माहिती पाहू.
  • अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनेचा उद्देश्य.;

मराठा समाजाच्या उत्थानासाठी, तसेच मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कर्ज योजना वापर केला जातो.

सदरील योजनेतून मराठा समाजातील तरुणांना बिनव्याजी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

मराठा आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेचे लाभार्थी कोण?

वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेली व्यक्ती, या योजनेसाठी पात्र मानली जातात.

अशा कुटुंबातील व्यक्ती दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात. या योजनेतील सरकारी नियमानुसार भरवण्यात आलेल्या ठराविक निधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव असतो.

 महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची पात्रता;’

1 ) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा.

2) लाभार्थ्याने कोणत्याही महामंडळाच्या लाभ घेतलेला नसावा.

3)लाभार्थी हा कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेचा थकबाकीदार नसावा.

4)या महामंडळातील कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्याची वयोमर्यादा पन्नास वर्ष पुरुषांसाठी तर 55 वर्ष महिलांसाठीअशी ठरवण्यात आलेले आहे.

5) लाभार्थ्याने अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या वेब पोर्टल वर नाव नोंदणी केलेली असावी.

6) कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.

7)सदरील लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.

योजनेतील ठळक मुद्दे.

1)ज्या उद्योग व्यवसायासाठी लाभार्थी कर्ज घेत आहे ते प्रकल्प क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यातील असावे.

2)सदरील प्रकल्प व्यापार विक्री सेवा कृषी उत्पादन लघु व मध्यम उद्योग या संबंधित असावे.

3)एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभार्थी असेल.

4)शासनाच्या नवीन धोरणानुसार एकाच कुटुंबातील व्यक्ती, हे महामंडळाच्या कर्ज यादी मध्ये सहा कर्जदार असतील. तर अशी प्रकरण सुद्धा महामंडळाकडून मंजूर होत आहेत. परंतु अर्जदार याच्या नावासमोर प्रथम कर्जदार असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

5)लाभार्थी जर कर्जाची परतफेड नियमित करत नसेल व्याजाचा परतावा हा मिळणार नाही.

महा स्वयम पोर्टल ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

6)अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ; लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा मुद्दल अधिक व्याज अशाप्रकारे अनुदान स्वरूपात देईल.त्याचबरोबर जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज बँकेकडून देईल.म्हणजेच तीन लाख रुपयांपर्यंत परतावा हा लाभ मिळेल.

7)कर्ज घेतलेल्या बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजाची रक्कम बँकेत भरणा केले जाईल, त्याच वेळेस लाभार्थ्याच्या लिंक असलेल्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा केली जाईल.सदरील व्याज परतावा प्रत्येक महिन्यामध्ये व वेळेवर हप्ता भरल्यास देण्यात येईल.

updates a2z